Tuesday, September 8, 2026
Homeमहाराष्ट्रNagpur Blast : नागपूर हादरले! स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट; १२ कामगारांचा...

Nagpur Blast : नागपूर हादरले! स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट; १२ कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर

नागपूर । Nagpur

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव परिसरात आज सकाळी रक्ताचा थरार पाहायला मिळाला. येथील ‘SBL’ या स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत सकाळी ७ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

- Advertisement -

या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत १२ कामगारांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती पोलिसांनी दिली असून, अनेक कामगार गंभीररीत्या जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राऊळगाव येथील SBL कंपनीमध्ये बारुद, डेटोनेटर्स आणि इतर घातक स्फोटक द्रव्ये तयार केली जातात. सकाळी नेहमीप्रमाणे काम सुरू असताना अचानक एका युनिटमध्ये प्रचंड मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज कित्येक किलोमीटरपर्यंत ऐकू आला. स्फोटानंतर कंपनीच्या परिसरात मोठी आग लागली आणि आकाशात धुराचे लोट पसरले. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी कंपनीबाहेर मोठी गर्दी केली आहे. आपल्या हक्काच्या माणसांचा जीव गेल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असून कंपनी प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला जात आहे. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र स्फोटक हाताळताना झालेल्या चुकीमुळे किंवा तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, या परिसरातील स्फोटक कंपन्यांमध्ये अपघातांची मालिका थांबताना दिसत नाही. गेल्या वर्षी १६ फेब्रुवारी रोजी याच राऊळगाव शिवारातील ‘एशियन फायर वर्क्स’ या फटाका कारखान्यातही असाच भीषण स्फोट झाला होता. त्या घटनेतही दोन कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता. वर्ष उलटत नाही तोच पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडल्याने औद्योगिक सुरक्षा विभागाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गावगाडा आता कुणाच्या हाती?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने जिल्ह्यातील 753 ग्रामपंचायतींच्या कारभाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. निवडणुका होईपर्यंत गावांचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी नियुक्त करण्यात...