मुंबई | Mumbai
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्यानं (Nana Patekar Passes Away Due To Cardiac Arrest) मृत्यू झालाय. वयाच्या ७५ व्या वर्षी नानांनी अकाली एक्झिट घेतली. त्यांचे जाणे प्रत्येकाच्याच मनाला चटका लावणारे आहे. नानांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांचे जुने व्हिडीओ आणि मुलाखती पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यापैकी स्वतःच्या मृत्यूबद्दल आणि अंत्यसंस्काराबद्दल नाना पाटेकर यांनी केलेले एक वक्तव्य सध्या विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. “माझ्या सरणासाठी सुकी लाकडं काढून ठेवली आहेत,” असे नाना यांनी काही वर्षांपूर्वीच्या मुलाखतीत सांगितले होते. विशेष म्हणजे, मृत्यूबद्दल बोलतानाही त्यांनी नेहमीच्या मिश्कील आणि परखड शैलीतच भाष्य केले होते.
नानांची काही वक्तव्य तर, अगदी मनाला चटका लावणारी असायची. कित्येकदा नाना बोलायचे आणि अंगावर सर्रकन काटा यायचा. नाना पाटेकरांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेक जुने व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यातलाच एक व्हिडीओ अगदी डोळे पाणावणारा आहे. नानांचे ते शब्द ऐकून अक्षरशः हादरून जायला होतं.
https://t.co/GLqT6VXcD5— Ram Gopal Varma (@RGVzoomin) October 8, 2026
स्वतःच्या अंत्यविधींबाबत सांगणारा नाना पाटेकरांचा एक व्हिडीओ दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ट्वीट केलाय. या व्हिडीओमध्ये नाना पाटेकरांनी आपल्या मृत्यूबाबत थेट वक्तव्य केलंय. तसेच, आपल्या सरणावर रचण्यासाठी लागणारी लाकडंही स्वतः काढून शेतात एका बाजूला रचून ठेवल्याचं नाना सांगतायत.
“मला माहितीय कधी ना कधी मला जायचंय, त्यासाठी 12 मण लाकडं लागणार आहेत, तेवढीच लागणार आहेत… हिच माझी शेवटची संपत्ती… बाळा मी माझ्या सरणासाठी लागणारी लाकडं जमा करुन ठेवलीत, ती सगळी लाकडं सुकलेली आहेत, त्यातच मला जाळायचंय, ओली लाकडं अजिबातच वापरु नका, नाहीतर खूप धूर होईल… मित्र-मंडळी, शेजारी-पाजारी सगळेच जमा होतील… त्यांच्या डोळ्यांत धूर जाईल, पाणी येईल त्यांच्या डोळ्यांतून… आणि माझ्या मृत्यूनंतर गैरसमज होईल की, हे सगळे माझ्यासाठीच रडतायत… कमीत कमी मी मेल्यानंतर तरी गैरसमज नकोत…”, असं अंगावर काटा आणणारं वक्तव्य नाना पाटेकरांनी केलेलं.



