Tuesday, September 8, 2026
HomeनंदुरबारNandurbar News: जिल्हाधिकाऱ्यांच्या कृतीनं वेधलं सर्वांच लक्ष; जुळ्या मुलांचा अंगणवाडीत घेतला प्रवेश

Nandurbar News: जिल्हाधिकाऱ्यांच्या कृतीनं वेधलं सर्वांच लक्ष; जुळ्या मुलांचा अंगणवाडीत घेतला प्रवेश

नंदुरबार | Nandurbar
उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्हा हा आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या जिल्ह्यात मिळणाऱ्या सेवा तोकड्या असतात असे समजले जाते. त्यातच बहुतांश पालक आपल्या पाल्यांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेत असल्याचे चित्र आहे. यामुळे सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली आहे. मात्र, या कृतीला नंदूरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी छेद दिला असून डॉ. मिताली सेठी यांनी आपल्या जुळ्या मुलांचा प्रवेश शहरातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, टोकरतलाव येथील अंगणवाडीत केला आहे.

नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी आपल्या जुळ्या मुलांना सरकारी शाळेत प्रवेश घेऊन दिला आहे. शहरातील उच्च दर्जाच्या शाळांना फाटा देत त्यांनी आपल्या मुलांना सरकारी अंगणवाडीत दाखल करत सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. त्यामुळे त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतूक होत आहे. दरम्यान सेठी या आपल्या मुलांना शाळेत सोडायला जातानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

डॉ. मिताली सेठी यांनी शुकर आणि सबर यांना नंदुरबारच्या मुख्य शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या टोकर तलाव अंगणवाडीत दाखल केले आहे. त्यांनी आपल्या जुळ्या मुलांना शालेय जीवनाची पूर्वकल्पना देणाऱ्या आणि शिस्तीचे महत्त्वाचे निकष बालवयातच पटवून सांगणाऱ्या या अंगणवाडीत पाठवयला सुरुवात केली आहे.

कितीही नाकारले तरीही सर्वसाधारणपणे गरीब घरातली मुले अंगणवाडीत प्रवेश घेतात, हा अनेकांचाच समज नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी मोडीत काढून स्वतः च्या जुळ्या मुलांना जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीत घातले आहे. या अंगणवाडीतल्या सेविका आणि मदतनीसांनी तयार करुन घेतलेल्या ‘झोळी’ची कल्पना आवडली. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना या शाळेत घातले.

या ठिकाणी शाळा आणि अंगणवाडी एकाच प्रांगणात असल्याने दोन्हीवर लक्ष तर राहीलच शिवाय जिल्ह्यातल्या इतर अंगणवाडीमध्ये देखील काय सुधारणा करता येईल याबाबत देखील जातीने लक्ष घालता येईल, या उद्देशानेचे मुले अंगणवाडीमध्ये घातल्याचे जिल्हाधिकारी सेठी यांनी स्पष्ट केले. सामाजिक दायित्वातून त्यांनी उचललेले हे पाऊल इतरांसाठी प्रेरणादायी आणि कौतुकास्पद असून, ते अनुकरणीयसुद्धा आहे असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : “मराठा समाजाला आतापर्यंत आमच्या सरकारने…”; CM फडणवीस स्पष्टच...

0
रायगड | Raigad मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आंतरवालीत उपोषणाला बसले असून, आज (मंगळवार) त्यांच्या उपोषणाचा ११ वा...