Friday, July 3, 2026
HomeUncategorizedअक्कलकुवा तालुक्याच्या सीमेवर आढळला कोरोना रुग्ण

अक्कलकुवा तालुक्याच्या सीमेवर आढळला कोरोना रुग्ण

अक्कलकुवा – 

खापर- अक्कलकुवा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या गुजरात राज्यातील डेडियापाडा व सेलंबा तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने तालुक्याच्या सीमेवर असलेल्या गावांमध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे.

- Advertisement -

अक्कलकुवा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या नर्मदा जिल्ह्यात तीन कोरोना पॉझीटीव रुग्ण आढळून आल्याने तालुक्यातील प्रशासनाकडून विशेष खबरदारी म्हणून गुजरात लगतच्या सर्व सिमा या सील करण्यात येत आहे

त्यातच खापर जवळच असलेले गुजरात मधील सेलंबा येथे कोरोना पॉझिटिव रुग्ण आढळून आल्याने खापर ग्राम पंचायत तर्फे गावातील सर्व व्यापार व व्यवहार तीन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.फक्त दवाखाना व मेडिकल सुरु राहणार आहेत हे तीन दिवस गावातील नागरिकांनी विनाकारण घरातून बाहेर पडू नये व अत्यावश्यक कामकरिता निघाल्यास तोंडाला मास्क या रुमाल लावल्या शिवाय कोणीही निघू नये असे आवाहन सरपंच सौ करुनाबाई वसावे, उपसरपंच विनोद कामे,ग्रामविस्तार अधिकारी विनोद ढोढरे यांनी केले आहे

अक्कलकुवा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या गुजरात राज्यातील डेडियापाडा व सेलंबा तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने तालुक्याच्या सीमेवर असलेल्या नवापाडा तलंबा काकडी आंबा रामपूर मिर्‍या भारी पाडा शेंदवा न पाडा या गावांमधील ग्रामसुरक्षा दल यांचेशी नाकाबंदी करण्यासंदर्भात गटविकास अधिकारी सी.के. माळी शांनी मार्गदर्शन केले.

ताज्या बातम्या

गुटखा

Nashik Crime News: इगतपुरी येथील समृद्धी महामार्गालगत ६९ लाख ३३ हजार...

0
इगतपुरी । प्रतिनिधीतालुक्यातील पिंप्रीसदो फाट्याजवळील समृद्धी महामार्गाचा वापर करून राज्यात व बाहेर अन्य जिल्ह्यांत होणारी राज्यातील प्रतिबंधित सुगंधी तंबाखु, गुटखा तस्करी होत असतांना इगतपुरी...