Friday, September 11, 2026
Homeनंदुरबारनंदुरबार येथे महिलेचा दगडाने ठेचून खुन : एकास अटक

नंदुरबार येथे महिलेचा दगडाने ठेचून खुन : एकास अटक

धडगांव तालुक्यातील असली येथे लाकडे तोडण्यासाठी शेतात आलेल्या महिलेचा दगडाने खुन करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पोलीसांनी एकाला अटक केली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगांव तालुक्यातील असली गावाच्या मुडार डोंगराच्या  उतारावर संगीता किशन पाडवी (३०) रा.तलाईचा मालपाडा,ता धडगांव हि मयत महिला सत्या दवल्या वसावे याच्या शेतात लाकडे तोडण्यासाठी गेली असता सत्या वसावे याला राग येवुन त्याने संगीता पाडवी हिच्या  डोक्यावर व डोळयावर दगडाने गंभीर दुखापत करून तिच्या मरणास कारणीभुत झाला.व पुरावा नष्ट केला.
याप्रकरणी किसन फुलसिंग पाडवी रा.तलाईचा मालपाडा,ता.धडगाव याने दिलेल्या फिर्यादीवरून धडगांव पोलीस ठाण्यात सत्या दवल्या वळवी रा. तलाईचा मालपाडा,ता.धडगाव याच्या विरूध्द भादवि कलम ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी सत्या दवल्या वळवी याला अटक करण्यात आली असुन पुढील तपास पोनि गवळी करीत आहेत.

ताज्या बातम्या

Shirdi : ना. विखे यांच्यावरील एकेरी टीका खपवून घेणार नाही, जरांगेंना...

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीने वर्षभर सातत्याने प्रयत्न करून अनेक...