Friday, September 11, 2026
HomeनगरAhilyanagar : पोलीस भरती प्रशिक्षणार्थी युवतीचा अकादमी संचालकावर गंभीर आरोप

Ahilyanagar : पोलीस भरती प्रशिक्षणार्थी युवतीचा अकादमी संचालकावर गंभीर आरोप

पीडितेच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी येथील एका करिअर अकादमीत प्रशिक्षण घेणार्‍या युवतीने अकादमीच्या संचालकाविरूध्द विनयभंग, जातीवाचक शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी संबंधित युवतीने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून योध्दा राजे पवार मेजर (रा. अहिल्यानगर) याच्याविरूध्द बुधवारी (9 सप्टेंबर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

फिर्यादी युवती ही बीड जिल्ह्यातील रहिवासी असून ती पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी येथील शिवरक्षक करिअर अकादमीत पूर्व प्रशिक्षणासाठी दाखल झाली होती. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, अकादमीत दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी संचालक योध्दा राजे पवार याने तिला जुन्या हॉस्टेलमध्ये राहण्यास सांगितले. मात्र, तिने तेथे राहण्यास नकार दिल्याने तिला शिक्षा म्हणून क्लासरूम व कार्यालय झाडण्यास लावले जात असल्याचा आरोप तिने केला आहे. इतर मुलींनाही अशीच कामे लावावीत, असे सांगितल्यानंतर संचालकांकडून तिला, तू मला खूप आवडतेस, मी तुला सांगेल तसे करत नाहीस म्हणून तुला ही शिक्षा आहे, असे सांगितले जात असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. तसेच, तू माझे ऐकत नाहीस, तू रूम करून एकटी राहा, असे सांगून आपल्याला वारंवार त्रास दिला जात असल्याचा आरोपही युवतीने केला आहे.

फिर्यादीतील माहितीनुसार, 17 जुलै रोजी दुपारी क्लास सुटल्यानंतर संचालकाने तिला कार्यालयात बोलावले. त्यावेळी तू मला खूप आवडतेस, असे म्हणत गैरवर्तन केले. घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही युवतीने केला आहे. 3 सप्टेंबर रोजी युवतीने आपल्या आईला अकादमीत बोलावून घेतले. आईसमोर तिने अकादमी संचालकाकडून घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी तिच्या आईने संचालकाकडे याबाबत विचारणा केली असता, आपल्याला व आईला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप युवतीने केला आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : ना. विखे यांच्यावरील एकेरी टीका खपवून घेणार नाही, जरांगेंना...

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीने वर्षभर सातत्याने प्रयत्न करून अनेक...