ओझे l विलास ढाकणे Oze
आमदार,विधानसभा उपाध्यक्ष पदावर गेले तरी जनतेशी नाळ जोडत जमिनीवर असलेला नेता म्हणून ओळख असलेले नरहरी झिरवाळ यांनी आता कॅबिनेट मंत्रिपद मिळाले तरी आपल्या मतदारसंघातील आदिवासी विद्यार्थी यांची सहल आल्याची कळताच सकाळी सहापासून ते अकरा वाजेपर्यंत या विद्यार्थ्यांच्या बसमध्ये प्रवास करत त्यांच्यात रमत गमत त्यांना गेट वे ऑफ इंडिया ,राजभवन आदी दाखवत गाईड ची भूमिकाही बजावत मुलांचा आनंद द्विगुणित केला तर अकरा वाजता आपले मंत्री विभागाच्या बैठकीसाठी सह्याद्री अतिथी गृहावर जात आपली जबाबदारी ही पार पाडली दिवसभर मुलांनी मुंबईतील विविध प्रेक्षणीय स्थळे बघितल्यावर रात्री त्यांना स्टेटस या तारांकित हॉटेल मध्ये शही भोजनाचा आस्वाद दिला. प्रत्येक मुलाला तू कुणाचा र.. त्यांचे बोली भाषेत सर्वांशी हितगुज करस बास ला आईसला सांग जो ,अभ्यास करा मोठे व्हा अधिकारी व्हा असा सल्ला अन आशीर्वाद ही दिले झिरवाळ यांच्या या प्रेमाने विद्यार्थी भारावून गेले.
कर्मवीर रा.स.वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्था संचलित भनवड येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेची शैक्षणिक सहल नुकतीच मुंबई येथे जाऊन आली. दोन दिवसीय या शैक्षणिक सहलीत मुलांच्या वैज्ञानिक, सामाजिक तसेच शैक्षणिक ज्ञानात भर पडावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुंबईमधील प्रसिद्ध नेहरू तारांगण, म्युझियम, राजभवन, विधान भवन इत्यादी स्थळांसोबत गरम पाण्याची कुंडे असणारे वज्रेश्वरी, गणेशपुरी अशा वैशिष्ट्यपूर्ण स्थळांचा सहलीत समावेश करण्यात आला होता.
बुधवारी सकाळी सहा वाजता ही सहल गेट वे ऑफ इंडिया येथे आल्याचे समजताच राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवाळ साहेब यांनी स्वतः या मुलांसोबत सहलीमध्ये वेळ दिला गेट वे ऑफ इंडिया पासून ते राजभवनापर्यंतचा प्रवास मुलांच्या बसमधून करतानाच मुंबईमधील प्रसिद्ध ठिकाणांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. राजभवनातील इमारतींची, परिसराची तसेच त्या ठिकाणी सापडलेल्या भुयारासंबंधी विस्तृत माहिती व प्रत्यक्ष त्या भुयारातून प्रवास विद्यार्थ्यांना घडवून आणला आपल्या एवढ्या व्यस्त कार्यक्रमांमधून खास विद्यार्थ्यांसाठी एवढा वेळ दिल्याने विद्यार्थी सुखावले त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद व उत्साह त्यानिमित्ताने पहावयास मिळाला.
आदिवासी भागातील ही मुले ज्यांनी कधी तालुका, जिल्ह्याचेही तोंड बघितले नाही अशी मुले राज्याच्या राजधानीत येऊन अगदी हरखून गेल्याचे पहावयास मिळाले.आपली आकाशगंगा, ग्रह ,तारे यांच्या विषयी माहिती देणारे’ नेहरू तारांगण ‘या ठिकाणी मुलांनी प्रत्यक्ष आपल्या सूर्यमालेतील ग्रहांची व आकाशगंगेची माहिती घेतली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
सायंकाळच्या वेळी विद्यार्थ्यांना विधान भवनाला भेट देण्याची संधी नामदार झिरवाळ यांनी प्राप्त करून दिली. विद्यार्थ्यांना सभागृहात दाखवत सभागृहाचे कामकाज कसे चालते याविषयीची इथंभूत माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. विधानसभा, विधान परिषद यातील फरक सांगतानाच त्यांच्या कार्याची, सभागृहातील बैठकीविषयी माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. सायंकाळचे जेवण मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल ‘स्टेटसला ‘करण्याची संधी मुलांना मिळाली मुंबईतील चकाचक आणि महागड्या हॉटेल संस्कृतीची ओळख त्यानिमित्ताने या आदिवासी पाड्यावरील मुला-मुलींना झाली.
दोन दिवसीय या सहलीनंतर मुलांच्या चेहऱ्यावर अभूतपूर्व असा आनंद ओसंडून वाहत होता आणि “मी पण मुंबई पाहिली”! असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
या सहलीसाठी मंत्री नरहरी झिरवाळ ,संस्थेचे मार्गदर्शक तथा कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे , संस्थेचे अध्यक्ष शहाजी सोमवंशी दादा, संस्था सचिव बाळासाहेब उगले ,स्विय सहाय्यक अमर परुळेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.सहलीचे नियोजन व अंमलबजावणीसाठी शाळेचे मुख्याध्यापक गुलाब भुसाळ , सहल विभाग प्रमुख सचिन रणदिवे , तसेच डी बी शिंगाडे एम डी पवार बी पी जाधव बी एस उगले, प्रणिता आहेर, डी एम कावळे, ए के भोये यांनी परिश्रम घेतले.