Thursday, September 24, 2026
HomeनाशिकNashik News: पेठ तालुक्यातील ११ पर्यटक काठमांडूत अडकले; दूतावासाशी संपर्क, मदतीसाठी प्रयत्न...

Nashik News: पेठ तालुक्यातील ११ पर्यटक काठमांडूत अडकले; दूतावासाशी संपर्क, मदतीसाठी प्रयत्न सुरू

नाशिक | प्रतिनिधी
नेपाळमध्ये (Nepal Floods) निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील (Nashik) पेठ तालुक्यातील ११ पर्यटक (11 Tourist From Peth Taluka) काठमांडू (Stuck in Kathmandu) येथे अडकले आहेत. हे सर्व पर्यटक पेठ नगरपंचायत हद्दीतील असून, सध्या ते सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून (District Disaster Management Department) देण्यात आली आहे.

पर्यटनासाठी नेपाळमध्ये गेलेल्या या ११ जणांचा नेपाळमधील भारतीय दूतावासाशी संपर्क झाला असून, त्यांना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे. अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाकडून संकलित करण्यात आली असून, त्यांच्या सुरक्षित परतीसाठी आवश्यक कार्यवाही केली जात आहे.

- Advertisement -

संपादकीय : २८ ऑगस्ट २०२६ – कोणाच्या हितासाठी ही मुस्कटदाबी?

अडकलेल्या पर्यटकांमध्ये अर्जुन गणपत शिंदे, रोहित चंद्रकांत शिंदे, विशाल जालिंदर शिंदे, रुपेश मुकुंद घोंगे, अभिषेक राजेंद्र पवार, आकाश कृष्णा कोतुळकर, ओम राजेंद्र शिंदे, पीयूष विजय शिंदे, आयुष सोमनाथ शिंदे, करण शिवाजी शिंदे आणि शुभम भोलेनाथ शिंदे यांचा समावेश आहे.

दरम्यान, संबंधित कुटुंबीयांना प्रशासनाकडून माहिती देण्यात येत असून, पर्यटकांच्या संपर्कासाठी 9175067004 हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर केवळ व्हॉट्सअॅप कॉलद्वारे संपर्क होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : संकटाच्या काळात बांधावर पोहोचा; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचे अधिकार्‍यांना...

0
नाशिक |प्रतिनिधी| Nashik पावसातील खंडामुळे निर्माण झालेली पीक परिस्थिती, पीक विमा, वीजपुरवठा आणि शेतकर्‍यांच्या नुकसानभरपाईच्या प्रश्नांवर शासनाने गांभीर्याने लक्ष केंद्रित केले असून, ङ्गशेतकरी प्रथमम या...