Thursday, March 13, 2025
HomeनाशिकNashik Accident News : बँड पथकाच्या वाहनाला दुचाकी धडकल्याने युवक ठार

Nashik Accident News : बँड पथकाच्या वाहनाला दुचाकी धडकल्याने युवक ठार

देवळा | प्रतिनिधी | Deola

देवळा-कळवण रस्त्यावरील (Deola Kalwan Road) भऊर फाट्यावर मंगळवारी (दि.१७) रोजी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात (Accident) खर्डे ता.देवळा येथील युवक नितीन बाजीराव जाधव (२३) हा जागीच ठार झाला. देवळा पोलीस ठाण्यात रात्री उशीरा अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या वाहन चालकावर (Driver) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : नाशकात गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट; वालदेवी नदीत बुडून दोन युवकांचा मृत्यू

याबाबत देवळा पोलिसांकडून (Deola Police) मिळालेली माहिती अशी की, काल मंगळवार (दि.१७) रोजी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास खर्डे ता.देवळा येथील नितीन जाधव (२३) हा युवक आपल्या दुचाकीने घरी जात असताना देवळा-कळवण रस्त्यावरील भऊर फाटा नजीक बागलाण तालुक्यातील बँड पथकाचे वाहन रस्त्यावर उभे असताना त्याची धडक नितीन जाधवला बसल्याने तो जागीच ठार झाला.त्यानंतर या घटनेची माहिती देवळा पोलिसांना मिळताच सपोनि दीपक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन या अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या बँड पथकाच्या वाहनाला ताब्यात घेत चालकावर गुन्हा दाखल केला.

हे देखील वाचा : Nashik News : इंदिरानगर परिसरात एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

दरम्यान, मयत नितीन जाधव याच्यावर देवळा ग्रामीण रुग्णालयात (Deola Rural Hospital) आज बुधवारी (दि.१८) रोजी सकाळी ९ वाजता शवविच्छेदन करण्यात येऊन शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीन यांच्या पश्चात आई ,वडील ,दोन बहिणी ,एक भाऊ असा परिवार आहे. तसेच नितीनच्या अपघाती निधनामुळे खर्डे गावावर शोककळा पसरली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...