Monday, November 2, 2026
HomeनाशिकNashik Accident News : अज्ञात वाहनाच्या धडकेत २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Nashik Accident News : अज्ञात वाहनाच्या धडकेत २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati 

दिंडोरी रोडवर (Dindori Road) अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू (Youth Death) झाला. जनक एकवीर बिस्ट (वय २७, रा. राजसरोवर, कलानगर, दिंडोरी रोड) असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी (दि. ३०) रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात (Accident) झाला.

- Advertisement -

जनक बिस्ट हे रात्री हॉटेल चुलांगण येथून दुचाकीवरून घरी परतत होते. दिंडोरी रोडवरून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ते रस्त्यावर (Road) बेशुद्ध अवस्थेत पडले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी (Citizen) मदतीसाठी धाव घेतली. जखमी जनक यांना तातडीने नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. गावित यांनी तपासणीनंतर त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

या घटनेमुळे बिस्ट कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहनचालकाबाबतची माहिती आणि पुढील तपासाबाबत पोलिसांकडून (Police) कार्यवाही अपेक्षित असल्याचे मृताच्या नातेवाईकांची म्हणणे आहे.

ताज्या बातम्या

Pomegranate Rate : राहाता बाजार समितीत डाळिंबाला काय मिळतोय भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला 255 रुपयांपर्यंत प्रतिकिलोला भाव मिळाला. सोमवारी डाळिंबाच्या (Pomegranate) 2442 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब...