Sunday, September 13, 2026
HomeनाशिकNashik Accident News : 'त्या' तरुणाचा मृतदेह घेऊन नातेवाईकांची महापालिकेवर धडक; प्रवेशद्वारावर...

Nashik Accident News : ‘त्या’ तरुणाचा मृतदेह घेऊन नातेवाईकांची महापालिकेवर धडक; प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरु

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील कृषी नगर जॉगिंग ट्रॅकजवळ कामावरून घरी परतत असताना रात्रीच्या वेळी पावसामुळे आणि अंधार असल्यामुळे रस्त्यात आडवे टाकलेले काळे पाइप्सवर दुचाकी धडकल्याने सिद्धार्थ गोरे या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.१२) रात्री घडली. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Accident News : प्रशासनाचा निष्काळजीपणा! पाण्याच्या पाईपवर आदळून तरुणाचा मृत्यू, एक गंभीर

दरम्यान, या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. तर मयत सिद्धार्थ गोरेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांसह नागरिकांनी मृतदेह थेट नाशिक महापालिकेच्या प्रवेशद्वारावर नेत ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी मुख्य गेटला कुलूप लावल्याने नागरिकांनी मृतदेह गेटबाहेर ठेवत ठिय्या दिला आहे.

नेमकं काय घडलं?

मयत सिद्धार्थ गोरे आणि मनोज सूर्यवंशी हे दोन मित्र कामावरून घरी जात असतानाकृषी नगर जॉगिंग ट्रॅकजवळ पाण्याच्या पाइपलाइनचे काम सुरू होते. रात्रीच्या वेळी पावसामुळे (Rain) आणि अंधार असल्यामुळे रस्त्यात आडवे टाकलेले काळे पाइप्सच्या अगोदर चिखल साचलेला होता. त्या ठिकाणी सुरक्षेसाठी कोणतेही रिफ्लेक्टर लावले नसल्याने दुचाकी थेट पाईपला जाऊन धडकल्याने सिद्धार्थ गोरे या तरुणाचा मृत्यू (Youth Death) झाला. तर मनोज सूर्यवंशी हा गंभीर जखमी झाला. प्रशासकीय कामांदरम्यान नागरिकांची (Citizen) काळजी घेण्यासाठी योग्य सुरक्षा उपाय (रिफ्लेक्टर, सूचना फलक) व आदी गोष्टींची काळजी घेणे बंधनकारक असतानाही ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

शहर अभियंत्यांना घेराव

महापालिकेच्या कारभारावर आणि कंत्राटदारांवर वचक नसल्यामुळेच नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे, असा संताप व्यक्त करत संतप्त नागरिकांनी शहर अभियंता संजय अग्रवाल यांना घेराव घालून जाब विचारला. शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या ठिकाणी सुरक्षेच्या नियमांकडे वारंवार दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या घटनेमुळे महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि कंत्राटदारांच्या मनमानी कारभारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्या

काहीही झालं तरी आंदोलन थांबणार नाही, मुंबईत येणारच; मनोज जरांगे पाटलांचा...

0
जालना । Jalna मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची धग कायम असून, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १६वा दिवस आहे. १५ सप्टेंबर रोजी मुंबईकडे...