Friday, May 15, 2026
HomeनाशिकNashik Accident News : माजी आमदार निर्मला गावित यांना कारने उडवले; रुग्णालयात...

Nashik Accident News : माजी आमदार निर्मला गावित यांना कारने उडवले; रुग्णालयात उपचार सुरु

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

इगतपुरी- त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या माजी आमदार निर्मला गावित (Nirmala Gavit) यांना त्याच्या घराजवळ कारने उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत गावित गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, निर्मला गावित या आपल्या घराजवळ पायी आपल्या नातवाला फिरवत असताना पाठीमागून आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. यात त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याचे समजते.

निर्मला गावित या मूळच्या काँग्रेसवासी असून, त्यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून (Congress) झाली आहे. त्या माजी केंद्रीय मंत्री दिवंगत माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. निर्मला गावित या दोनवेळा इगतपुरी- त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या आमदार राहिल्या आहेत. २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. तसेच मे २०२५ मध्ये गावित यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे.

ताज्या बातम्या

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर तीन ट्रक पलटी; दोन जण जागीच ठार; दोन गंभीर...

0
पुणे | प्रतिनिधी Pune मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर बोरघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज संध्याकाळी एक भीषण अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने एका...