Saturday, October 31, 2026
HomeनाशिकNashik Accident News : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Nashik Accident News : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

ओझे| वार्ताहर | Oze

भरधाव वेगातील अज्ञात छोटा हत्ती वाहनाने (Vehicle) पुढे जाणाऱ्या दुचाकीला (Bike) मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार (Killed) झाला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, दिनकर चंदर चौधरी (वय २४) रा,मोरडा ,पो. माणी, ता. सुरगाणा हा युवक एमएच १५ एचपी ५३७९ या क्रमांकाच्या दुचाकीवरुन खेडगाव पिंपळगाव या राष्ट्रीय महामार्गावरुन (National Highway) मार्गक्रमण करत होता. यावेळी मागून येणाऱ्या भरधाव वेगात आलेल्या छोटा हत्ती वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली.

दरम्यान, या धडकेत दिनकर हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यु (Death) झाला. यानंतर नितीन चौधरी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

ताज्या बातम्या

सिंहस्थ महाकुंभमेळा : तरुणाईलाही सिंहस्थाची भुरळ; ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी जेन झी...

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik सिंहस्थ मेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याने केवळ ज्येष्ठ आणि धार्मिक भाविकांनाच नव्हे, तर तरुणाईलाही भुरळ घातली. आधुनिक जीवनशैलीत रमणाऱ्या तरुण-तरुणींनीही या ऐतिहासिक क्षणाचे...