Thursday, March 13, 2025
Homeक्राईमNashik Accident News : मालवाहू ट्रेलर पलटी झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू

Nashik Accident News : मालवाहू ट्रेलर पलटी झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू

इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri

नाशिक-मुंबई महामार्गावरील (Nashik-Mumbai Highway) टाकेघोटी जवळील हॉटेल ग्रँड परिवार समोर मालवाहू ट्रेलरचा भीषण अपघात (A Terrible Accident) झाल्याची घटना घडली. या अपघातात चालकाचा दबून जागीच मृत्यू (Death) झाला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की,बुधवार (दि.१२) रोजी ट्रेलर क्रमांक एमएच ४६ बीयु ६८५४ हा मुंबईहून सकाळच्या सुमारास नाशिककडे (Nashik) जात असतांना या ठिकाणी असलेल्या स्पीड ब्रेकरवर ट्रेलर चालकाने अचानक ब्रेक मारला. यावेळी ट्रेलरवर असलेला लोखंडी रोल कॅबीनवर सरकल्याने ट्रेलर पलटी झाला. यांत ट्रेलरचा चालक गुड्डू कुमार (वय ३८) राहणार मुंबई याचा ट्रेलरखाली अडकून जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा सहायक पोलीस निरीक्षक राम व्होंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिल अहीरे यांनी पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेत एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर क्रेनच्या सहाय्याने चालकाचा मृतदेह (Dead Body) बाहेर काढण्यात आला. या भीषण अपघातात ट्रेलरचा चक्काचूर झाला असुन चालकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात (Igatpuri Rural Hospital) पाठविण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...