नाशिक | Nashik
नाशिक-वलसाड (अहमदाबाद) महामार्गावरील पेठ तालुक्यातील (Peth Taluka) करंजाळीलगत असणाऱ्या सावळघाटात (Sawal Ghat) मंगळवारी (दि.०६) रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास खासगी लक्झरी बस पलटी होऊन भीषण अपघात (Accident) घडला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, आठ जण जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, महेंद्र पाल आणि राहुल ओझा असे अपघातात मृत्यू (Death) झालेल्यांची नावे आहेत. सदर अपघाताची माहिती थेट पंतप्रधान कार्यालयाला देण्यात आल्याने यंत्रणेकडून तातडीने बचावकार्य राबविण्यात आले. या घटनेतील जखमींना पुढील उपचारासाठी प्रथम दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात आणि नंतर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, स्थानिक पोलीस (Police) व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बसचे दरवाजे व खिडक्या तोडून प्रवाशांना बाहेर काढले. तर घाट परिसरात दाट धुके आणि दृश्य मानता कमी असल्यामुळे चालकाला रस्ता व वळणाचा अंदाज न आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.




