Thursday, October 8, 2026
Homeदेश विदेशराहुल गांधी-प्रियंका गांधींच्या अडचणीत वाढ; आकाशवाणी भवनातील ठिय्या आंदोलनाप्रकरणी गुन्हा दाखल

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या अडचणीत वाढ; आकाशवाणी भवनातील ठिय्या आंदोलनाप्रकरणी गुन्हा दाखल

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात सुरू असलेल्या INDIA आघाडीच्या आंदोलनाला आता कायदेशीर वळण मिळाले आहे. आकाशवाणी भवनाच्या परिसरात कथितरित्या परवानगीशिवाय प्रवेश करून आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासह इतर काही नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आकाशवाणी भवनातील कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे आधीच SIR (Special Intensive Revision), मतदार यादी आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून तापलेल्या राजकीय वातावरणात आणखी भर पडली आहे.

नेमकं काय घडलं?
मंगळवारी निवडणूक आयोगावर राहुल गांधींच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा काढणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना पोलिसांनी वाटेतच रोखले होते. यानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काही प्रमुख नेते अचानक आकाशवाणी भवनाच्या आवारात शिरले आणि तिथेच ठिय्या आंदोलनाला बसले. तब्बल ९ तास चाललेल्या या ठिय्या आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेतले होते. आता या प्रकरणी पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

- Advertisement -

गृहकर्जदारांच्या खिशावर वाढणार भार! RBI ने रेपो रेट वाढवला, जाणून घ्या EMIवर किती परिणाम होणार?

आकाशवाणी भवन प्रशासनाची तक्रार
आकाशवाणी भवनाच्या कर्मचाऱ्यांकडून संसद मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. त्यात राहुल गांधी, प्रियांका गांधी, काही खासदार आणि इतर व्यक्तींनी परवानगीशिवाय आकाशवाणी भवनाच्या परिसरात प्रवेश केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संवेदनशील सरकारी इमारतीच्या परिसरात परवानगीशिवाय प्रवेश करून आंदोलन करणे हा नियमांचा भंग असल्याचा प्राथमिक आरोप आहे. आकाशवाणी भवनातील आंदोलन रात्रीपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली जाणार नाही, असं पोलिसांनी आधीच सांगितलं होतं. आंदोलकांनी परिसर सोडावा, अशी सूचना करण्यात आली होती. तसेच, परिसर रिकामा न करणाऱ्यांना ताब्यात घेतलं जाईल, असा इशाराही देण्यात आला होता. त्यानंतर आंदोलन सुरू असतानाच राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इंडिया आघाडीतील इतर नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन विरोध नोंदवायचा असल्याचं म्हटलं होतं. मात्र, आपल्याला तिथे जाण्यापासून रोखलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. यावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने आयोगासोबत भेटीसाठी वेळ मागितला नव्हता, असं आयोगाने स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

राज

माणसाची दोन टोकाची रूपं असतात, यातलं दुसरं टोक नाना…; राज ठाकरेंची...

0
मुंबई | Mumbaiज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या आकस्मिक निधनाने महाराष्ट्रासह संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यातील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने नाना पाटेकर...