Monday, September 28, 2026
Homeक्राईमNashik Accident News : बळी मंदिराजवळ भरधाव ट्रकची मोपेडला धडक; युवकाचा जागीच...

Nashik Accident News : बळी मंदिराजवळ भरधाव ट्रकची मोपेडला धडक; युवकाचा जागीच मृत्यू

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Aagra Highway) अपघातप्रवण समजल्या जाणाऱ्या बळी मंदिर परिसरात (Bali Mandir Area) सोमवारी (ता.२२) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू (Death) झाला. भरधाव ट्रकने मोपेडला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मोपेडचालक युवक ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

- Advertisement -

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आडगाव शिवारातील बळी मंदिर परिसरातून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. सोमवारी सायंकाळी एक युवक आपल्या होंडा ॲक्टिव्हा मोपेडवरून (एमएच १५ एचव्ही ८४८८ – अपूर्ण) जात असताना ट्रक क्रमांक आरजे २७ जीडी ६२३१ ने त्याच्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की युवक रस्त्यावर फेकला गेला आणि ट्रकच्या मागील चाकाखाली सापडला. गंभीर दुखापतीमुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, बळी मंदिर परिसरात वारंवार अपघात होत असल्याने अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दुष्काळामुळे जिल्हा बँकेची आर्थिक कोंडी आणखी वाढणार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar कर्जमाफीच्या घोषणेमुळे गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक अडचणींचा सामना करणार्‍या नगर जिल्हा सहकारी बँकेच्या अर्थकारणावर यंदाच्या दुष्काळाचेही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्य...