Thursday, March 13, 2025
HomeनाशिकNashik Assembly Election 2024 : इगतपुरी मतदारसंघातून हिरामण खोसकर दुसऱ्यांदा विजयी

Nashik Assembly Election 2024 : इगतपुरी मतदारसंघातून हिरामण खोसकर दुसऱ्यांदा विजयी

नाशिक | Nashik

नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी काही मतदारसंघाच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. यात येवला, दिंडोरी, निफाड,देवळाली, नाशिक पश्चिम, बांगलाण, नांदगाव आणि मालेगाव बाह्य या मतदारसंघात पुन्हा एकदा विद्यमान आमदारांना संधी मिळाली आहे. अशातच आता नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीतून हिरामण खोसकर यांना सलग दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे.

- Advertisement -

इगतपुरी मतदारसंघातून हिरामण खोसकर यांना १ लाख १७ हजार २१४ मते मिळाली आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे लकी जाधव यांचा पराभव केला आहे. खोसकर यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यानंतर त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी देत निवडणुकीत रिंगणात उतरवले होते. यानंतर खोसकर यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजय मिळविला आहे.

उमेदवारांना मिळालेली मते अशी

हिरामण भिकाजी खोसकर(राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) – (विजयी) : १ लाख १७ हजार २१४
काशिनाथ मेंगाळ(मनसे) : २०३२०
धनाजी टोपले : ११३८
लकीभाऊ जाधव : ३०७०७
अनिल गभाले :९६४
अशोक गुंबाडे : ४५६
कांतीलाल जाधव : ३००
चंचल बेंडकोळी : ६२३
भाऊराव डगळे : (वंचित आघाडी): ६५११
शरद तळपाडे : ७६४
कैलास भांगरे :६४१
निर्मला गावित : २३६५५
जयप्रकाश झोले : १४३६
बेबीताई तेलम : १६२१
भगवान मधे : २८७९
विकास शेंगाळ : २०५०
शंकर जाधव : ६४६
नोटा : २२०९
एकूण झालेले मतदान : २ लाख १४ हजार १४४
YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...