Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNashik Assembly Election 2024 : कळवणमधून नितीन पवार तर चांदवडतून डॉ.राहुल आहेर...

Nashik Assembly Election 2024 : कळवणमधून नितीन पवार तर चांदवडतून डॉ.राहुल आहेर विजयी

नाशिक | Nashik

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यात राज्याच्या सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा महायुतीच्या हातात गेल्या आहेत. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील बहुतांश आमदारांनी देखील पुन्हा एकदा आमदार होण्याचा बहुमान मिळाला आहे. यात नाशिक जिल्ह्यातील येवला, मालेगाव बाह्य, दिंडोरी, निफाड, देवळाली इगतपुरी, बागलाण,नांदगाव आणि सिन्नर या मतदारसंघात पुन्हा एकदा विद्यमान आमदारांना संधी मिळाली आहे. अशातच आता कळवण आणि चांदवड मतदारसंघातील निकाल हाती आला आहे.

- Advertisement -

कळवण मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नितीन पवार विजयी झाले आहेत. त्यांनी माकपच्या जे.पी. गावित यांचा पराभव केला आहे. नितीन पवार यांना १ लाख १९ हजार १८१ इतकी मते मिळाली आहेत. तर जे.पी. गावित यांना १ लाख ७५९ मते मिळाली. त्यामुळे पवार यांचा ८ हजार ४३२ मतांनी विजय झाला.तर चांदवड मतदारसंघातून भाजपचे डॉ.राहुल आहेर विजयी झाले आहेत. आहेर यांना १ लाख ४ हजार ००३, प्रहारच्या गणेश निंबाळकर यांना ५५ हजार ४६०, कॉंग्रेसचे शिरीष कोतवाल यांना २३ हजार ००९ आणि अपक्ष उमेदवार केदा आहेर यांना ४८ हजार ४२२ मते मिळाली.त्यामुळे डॉ.राहुल आहेर यांचा ४८ हजार ४२२ मतांनी विजय झाला.

विधानसभा निवडणूक २०२४ कळवण सुरगाणा ११७

विजयी उमेदवार – नितीन अर्जुन पवार – मिळालेली मते – ११९१९१ – मताधिक्य – ८४३२

पराभूतांना मिळालेली मते

१- जिवा पांडू गावित (माकप)- ११०७५९
२- नितीन पवार (राष्ट्रवादी)-११९१९१
३- प्रभाकर पवार (बसपा)- ८३८
४- भिका थोरात (स्वराज पक्ष)- २२३०
५- नितीन पवार (अपक्ष)- १६३९
६- बेबीलाल पालवी (अपक्ष)- ८२६
प्रा.डॉ भागवत महाले (अपक्ष)- ९८७
एकूण मतदार- ३०१९९६
झालेले मतदान- २३६३८३
पुरुष मते- १२३१२९
महिला मते- ११३७०४
एकूण ७८. ४३ टक्के

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...