Thursday, August 20, 2026
HomeनाशिकNashik BJP News : गिरीश महाजनांच्या निकटवर्तीय माजी नगरसेवकाकडून आमदाराच्या हत्येची सुपारी?...

Nashik BJP News : गिरीश महाजनांच्या निकटवर्तीय माजी नगरसेवकाकडून आमदाराच्या हत्येची सुपारी? अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

नाशिक | Nashik

गेल्या काही दिवसांपासून नाशिक पोलिसांनी शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे काही अंशी गुंडांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. पोलिसांच्या या कारवायांमुळे राजकीय पुढारीही धास्तावले आहेत. अशातच विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल (सोमवारी) नांदेड येथे माध्यमांशी बोलतांना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नाशिकमधील एका माजी निकटवर्तीय नगरसेवकाने एका आमदाराच्या हत्येची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबाबतचा दानवे यांचा व्हिडीओही समोर आला आहे.

- Advertisement -

सदर व्हिडीओमध्ये अंबादास दानवे म्हणत आहे की, “नाशिक शहरातील एका माजी नगरसेवकाने एका आमदाराच्या हत्येची सुपारी दिली असून, हा गंभीर विषय आहे. हा माजी नगरसेवक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय असून,या प्रकरणाची पोलिसांनी आणि राज्य सरकारने चौकशी करावी. असे त्यांनी म्हटले आहे. दानवेंच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, अंबादास दानवेंनी बोलतांना आमदाराच्या हत्येची सुपारी देणारा माजी नगरसेवक कोण? याचा उल्लेख टाळलेला आहे यामुळे सस्पेन्स वाढला आहे. तर दुसरीकडे नाशिकच्या भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये तो नगरसेवक आणि आमदार कोण? याची कुजबुज सुरु आहे. तसेच मंत्री गिरीश महाजन यावर नेमकी काय प्रतिक्रिया देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ताज्या बातम्या

Rahata : सद्गुरु गंगागिरी महाराजांनी सप्ताहाच्या माध्यमातून शुद्ध भक्ती दिली

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata सद्गुरु गंगागिरी महाराजांनी सप्ताहाच्या माध्यमातून शुध्द भक्ती दिली. गंगागिरी महाराज सप्ताहात आहेत. शरीर मरते आत्मा मरत नसतो. आत्मा अचल आहे, असे...