नाशिक | प्रतिनिधी | Nashik
भारतीय जनता पक्षातील (BJP) लोकप्रतिनिधींच्या मुलांना तसेच नातेवाईकांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Local Body Election) उमेदवारी न देण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाने घेतला आहे. यासंदर्भात रविवारी (दि.२८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रीय सह संघटन सरचिटणीस शिवप्रकाश यांच्या उपस्थितीत मुंबईत (Mumbai) झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. या मुद्द्यावरूनही पडसाद उमटले आहेत.
अशा परिस्थितीतही उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या एक दिवस अगोदर (दि.२९) अनेक लोकप्रतिनिधी, आमदारांच्या मुला-मुलींनी व नातेवाईकांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले असून ही संख्या राज्यभरात शंभराच्यावर आहे. नाशिकमध्येही (Nashik) दखील हीच परिस्थिती आहे. या घराणेशाहीला आळा बसणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अशा ‘घरच्याच’ उमेदवारांबाबत पक्ष काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा : Nashik BJP Politics : नाशकात मोठी राजकीय घडामोड; भाजपने बड्या नेत्याच्या मुलाची उमेदवारी कापत दुसऱ्या नेत्याच्या मुलाला दिल्याची चर्चा
महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सत्ताधारी भाजपकडे इतर पक्षांमधून आयारामांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वाचीही उमेदवारी देताना मोठी कसोटी लागत आहे. त्यामुळेच भाजपने लोकप्रतिनिधी, आमदार यांच्या नातेवाईकांना आणि मुला-मुलींना उमेदवारी द्यायची नाही. असा ठाम निर्णय घेतला आहे. असे असले तरी दुसरीकडे मात्र पुणे व मुंबई सह इतर महानगरपालिकांमध्ये लोकप्रतिनिधींच्या मुला-मुलींसह नातेवाईकांनाही उमेदवारी दिली जात असल्याचे समोर आले आहे.
नाशिकमध्येही यापेक्षा वेगळी परिस्थिती नसून लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात उमेदवारी मागितलेली आहे. आमदारांचीही मुले मुली व जवळच्या नातेवाईकांनी उमेदवारी मागत पक्षाचा काय जो निर्णय होईल तो होईल, असे म्हणत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी उमेदवारी अर्ज (Application for Candidacy) दाखल करून ठेवले आहेत.
… तर त्यांना जागा दाखवून देऊ
भाजपने राज्यस्तरावर उमेदवारी न देण्याबाबत घेतलेला निर्णय प्रत्यक्षात अंमलात आणल्यास या नातेवाईकांच्या उमेदवारीवर टाच येणार, हे आता स्पष्ट झाले आहे. मात्र, या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी न झाल्यास पक्षांतर्गत नाराजीचा सूर मोठ्या प्रमाणात उमटेलच. शिवाय असे जर झाले तर आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, अशी कुजबुज भाजप अंतर्गत एकनिष्ठ कार्यकर्त्यांमधून ऐकावयास येत आहे.





