Thursday, October 1, 2026
HomeनाशिकNashik BJP Politics : नाशकात मोठी राजकीय घडामोड; भाजपने बड्या नेत्याच्या मुलाची...

Nashik BJP Politics : नाशकात मोठी राजकीय घडामोड; भाजपने बड्या नेत्याच्या मुलाची उमेदवारी कापत दुसऱ्या नेत्याच्या मुलाला दिल्याची चर्चा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना अद्याप महायुतीकडून युतीची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे युती होणार की स्वबळावर लढणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. युतीसाठी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी पुढकार घेऊन काल (रविवारी) महायुतीच्या नेत्यांची (Mahayuti Leader) बैठक बोलावली होती. परंतु, ही बैठक होऊ शकली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये युती फिस्कटल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

दुसरीकडे सिंहस्थ कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन शहरात ठाण मांडून असून, भाजपच्या (BJP) उमेदवारांची नावे निश्चित करण्यात व्यस्त आहेत. यात हमखास निवडून येणाऱ्या काही प्रभागांमधील उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे. तर नुकतेच विरोधी पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या एका बड्या नेत्याच्या मुलाचे तिकीट कापल्याची माहिती समोर आली आहे. या बड्या नेत्याच्या मुलाने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचारही सुरु केला आहे. परंतु, या बड्या नेत्याच्या मुलाचे तिकीट कापल्याची चर्चा असून, त्याने शिंदेंच्या शिवसेनेकडे उमेदवारीसाठी मुबंईत (Mumbai) फील्डिंग लावल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या बड्या नेत्याच्या मुलाच्या (Son) जागेवर भाजपमधील एका बड्या नेत्याच्या मुलाला उमेदवारी देण्यात येणार असल्याचे समजते. मुलाच्या भविष्यासाठी भाजपमध्ये आलेला हा बडा नेता आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी आता इतर पक्षाकडे फिल्डिंग लावत असल्याचे बोलले जात आहे. महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने शंभर प्लसचा नारा दिला आहे. दुसरीकडे युतीचा तिढा सुटत नसल्याने मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून युतीबाबत काही ठोस घोषणा होते का? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून आहे.

ताज्या बातम्या

Tribal Student Long March : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात फुट; एक गट...

0
नाशिक | Nashik आश्रमशाळा विद्यार्थ्यांचे (Tribal Student) प्रलंबित प्रश्न आणि आदिवासी मंत्र्यांसह मुख्य सचिव व आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी राजभवनाच्या दिशेने जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...