नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पुर्ननिरीक्षण दाव्याचा निकाल पक्षकाराच्या बाजूने लावून देण्याचे व निकाल (Result) जाणीवपुर्वक उशीराने अपलोड करीत ३० हजार रुपयांची लाच (Bribe) मागणाऱ्या विभागीय महसूल कार्यालयातील सहाय्यकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Department) पकडले आहे.
कैलास पाराजी वैरागे (५१, रा. शिवदर्शन सोसायटी, नाशिकरोड) असे संशयित लाचखोराचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात एका वकीलाने वैरागे विरोधात तक्रार (Complaint) दिली होती. तक्रारदार वकीलाच्या पक्षकाराच्या बाजुने पुर्ननिरीक्षणाचा निकाल देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागितली. त्यासाठी संशयित वैरागे याने निकाल जाणीवपुर्वक उशीरा अपलोड केला होता.
तसेच २९ व ३१ ऑगस्ट आणि ६ सप्टेंबरला तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारीत तथ्य आढळल्याने विभागाने सापळा रचला. मात्र,वैरागे याने लाचेची रक्कम स्विकारली नाही. त्यामुळे नाशिकरोड पोलिस ठाण्यात (Nashik Road Police Station) वैरागे विरोधात लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.