Tuesday, May 5, 2026
HomeनाशिकNashik Bribe News : जलजीवनमध्ये लाचखोरी; दोन लाखांची लाच घेताना उपअभियंत्यासह कनिष्ठ...

Nashik Bribe News : जलजीवनमध्ये लाचखोरी; दोन लाखांची लाच घेताना उपअभियंत्यासह कनिष्ठ ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) मुख्य कार्यकारी अधिकारीपदी ४८ तासांपूर्वीच ओमकार पवार (आयएएस) यांनी पदभार स्वीकारला असतानाच दिंडोरी पंचायत समितीत (Dindori Panchayat Samiti) उघडउघड लाचखोरी सुरुच असल्याचे समोर आले आहे. त्यांना पदभार स्विकारून ४८ तास होत नाही तोच, विविध पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता योगेश नारायण घारे व त्याचा पंटर कनिष्ठ उपअभियंता मनीष कमलाकर जाधव यांना दोन लाख सोळा हजारांची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले आहे.

- Advertisement -

नाशिक एसीबीने (Nashik ACB) शुक्रवारी (दि.८) सायंकाळी ही कारवाई केली. कामाचे देयके मंजूर करण्याच्या बदल्यात ही लाच स्विकारण्यात आल्याची फिर्याद दाखल झाल्याने दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित घारे हा काठे गल्लीतील तिरुमला भूमिका बिल्डिंग तर, जाधव हा पंचवटीतील (Panchvati) हिरावाडी येथे असलेल्या कुंजविहार सोसायटीतील रहिवाशी आहे.

दरम्यान, तक्रारदार हा शासकीय ठेकेदार असून त्याने जलजीवन मिशन पाणीपुरवठा (Water Supply) योजनेअंतर्गत केलेल्या कामाचे बक्षीस व सध्याच्या प्रलंबित कामाचे बिल मंजूर करुन देण्यासाठी लाच मागितली. घारे याने लाच मागून जाधवने प्रोत्साहन दिले आहे. तक्रार मिळताच सापळा रचण्यात आला व घारे याला दिंडोरी पंचायत समितीत रंगेहाथ पकडण्यात आले. संशयितांच्या घराची झडती सुरु असून घारेचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रतिक्विंटलला 1500 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत कांद्याची (Onion) 5966 गोण्यांची आवक...