नाशिक | भारत पगारे | Nashik
शहर व परिसरात दसरोज दुचाकी चोरीच्या घटना घडत असतानाच शहर पोलिसांकडून (City Police) वाहन चोरांचा (Thieves) शोध घेऊन कारवाई (Action) करून दुचाकी जप्त केल्या जातात. मात्र, या कारवायांच्या तुलनेत दुचाकी चोरीचे प्रमाण अधिक आहे. दररोज शहरातील किमान दोन पोलिस ठाण्यांत दुचाकी चोरीचे गुन्हे नोंदविले जातात.
शहरातील व्यावसायिक संकुले असो किंवा स्रणालयांचा परिसर अथवा बाजारपेठ, हॉटेल, लॉन्सबाहेरील वाहनतळ असो, चोरटे बिनदिक्कत दुचाकी चोरून नेत असल्याचे दिसून येते. सर्वाधिक दुचाकी चोरीच्या घटना पंचवटी आडगाव, नाशिकरोड, सरकारवाडा, सिडको, अंबड, सातपूर, गंगापूररोड या भागात घडतात. दुचाकी चोरीच्या घटनांचे प्रमाण कमी करण्यास पोलिसांना (Police) फारसे यश आलेले नाही. काही दिवसांपूर्वीच पंचवटी पोलिसांनी एका दुचाकी चोराला बेड्या ठोकून त्याच्याकडून चोरीच्या सात दुचाकी जाम केल्या.
नाशिकरोड पोलिस ठाण्याच्च्या (Nashik Road Police Station) गुन्हे शोध पथकानेही मागील आठवड्यात दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणून आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या.अशा प्रकारच्या कारवाया पोलीस ठाण्यांकडून महिना किंवा दोन महिन्यांतून केल्या जातात, मात्र दुचाकी चोरीच्या घटना या दररोजच घडत असतात.चोरीच्या दुचाकींची सहजरीत्या विक्री करता यावी, कोणाला संशय येऊ नये, यासाठी डेटिंग-पेंटिंग करणाऱ्यांना हाताशी धरून चोरटे संगनमताने शक्कल लढवत असल्याचेही मोटारसायकल चोरी शोध पथकाने आठवडाभरापूर्वी उघडकीस आणले. एका दुचाकी चोरासह डेटिंग-पेंटिंग करणान्यास ताब्यात घेत चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला.
चोरीच्या दुचाकी जुनाट अवस्थेत असल्या तरी ग्रामीण भागात (Rural Area) किंवा परजिल्ह्यात चोरटे त्यांची विक्री करून चांगली रक्कम पदरात पाडून घेतात, चोरांकडून नवीन दुचाकींनाच लक्ष्य केले जाते असे नाही, तर जुन्या मोटारसायकलीही चोरटे लंपास करतात. नवीन दुचाकींच्या किमतींमध्ये भरमसाठ बाढ झाली आहे. मोपेड दुचाकी असो किंवा गिअरची बाइक, सर्वांच्याच किमती लाखाच्या पुढे गेल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून वाहन कर्जाचा आधार घेत दुचाकी खरेदी केली जाते. दुसरीकडे मात्र चोरटे दुचाकी लांबचत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. लाखाची गाडी घ्यायची, मात्र सुरक्षिततेची हमी देणार कोण, हा प्रश्न आहे.
स्वतंत्र पथकाची निर्मिती
शहरात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलीस आयुक्तालयाकडून काही महिन्यांपूर्वीच आयुक्तालय स्तरावर गुन्हे शाखेचे मोटारसायकल चोरी शोधमथकगठित करण्यात आले आहे. या पथकाकडून दुचाकी चोरीच्या दाखल गुन्ह्यांची उकल केली जाते.
३२ दुचाकी शोधल्या
चालू डिसेंबर महिन्याच्या २० दिवसांत पोलिसांनी वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून एकूण २२ दुचाकी हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले आहे. मोटारसायकल चोरी शोध पथकाने नऊ, गुन्हे शाखा युनिट-२ पथकाने एक, पंचवटी गुन्हे शोध पथकाने सात, नाशिकरोड, गुन्हे शाखा युनिट -१पथकानेही डझनभर दुचाकी जप्त केल्या आहेत.
परिसरनिहाय चोरी
पंचवटी – ८, अंबड- ११, म्हसरूळ ३, आडगाव-३, नाशिकरोड- ३, उपनगर-२, सातपूर-३, इंदिरानगर-२, मुंबई नाका-२, सरकारवाडा-४, भद्रकाली-२, गंगापूर-१.