Thursday, March 13, 2025
Homeक्राईमNashik Crime : १५०० मेट्रिक टन कांदा परस्पर विकला; फसवणुकीचा गुन्हा दाखल

Nashik Crime : १५०० मेट्रिक टन कांदा परस्पर विकला; फसवणुकीचा गुन्हा दाखल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नॅशनल ॲग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया’ (नाफेड) आणि नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) फेडरेशनकडून इतर सुमारे १,५८९ मेट्रिक टन कांदा (Onion) ३५ रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करून तो बाजारात चढ्या दराने विक्री करून नाशिक नाफेडला साडेपाच कोटी रुपयांचा गंडा (Fraud) घालण्यात आला आहे.

- Advertisement -

गोवा मार्केटिंग को-ऑप. फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक काशिनाथ नाईक यांनी हा घोटाळा (Scam) केला असून नाशिकच्या (Nashik) ‘नाफेड’ तर्फे मुंबईनाका पोलिसात नाईक याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. त्याने नाफेडसह जनतेला गंडा घातल्याने हे प्रकरण शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे (City Financial Offenses Branch) वर्ग करण्यात आले आहे.

शहरातील नाफेड कार्यालयातील कर्मचारी जयंत रमाकांत कारेकर (५८, रा. नाशिकरोड) यांनी मुंबईनाका पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार द गोवा स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग ॲण्ड सप्लाय फेडरेशनने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ या कालावधीत नाफेडकडून कांदा खरेदी केली. हा कांदा ३५ रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करण्यात आला होता. मात्र संशयित नाईक याने फेडरेशनमार्फत बाजारात हाच कांदा चढ्या दराने विक्री केला.

दरम्यान, त्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अपहार (Embezzlement) करून नाफेडच्या योजनेनुसार तब्बल ५ कोटी ५६ लाख २१ हजार १६० रुपयांची फसवणूक केली. त्यामुळे संशयिताविरुद्ध (Suspect) शनिवारी (दि. ८) दुपारी चार वाजता मुंबईनाका पोलिसात (Mumbai Naka Police) गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, नाफेडने बाजारातील मूल्यांसह इतर मुद्यांनुसार कांदा विक्रीची तपासणी सुरू केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...