Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमNashik Crime : कुंभमेळामंत्र्यांवर तोंडसुख घेणे भोवले; राडा घालणाऱ्या पिता-पुत्रासह महिलेवर गुन्हा

Nashik Crime : कुंभमेळामंत्र्यांवर तोंडसुख घेणे भोवले; राडा घालणाऱ्या पिता-पुत्रासह महिलेवर गुन्हा

व्हिडिओप्रकरणीही गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

कुंभमेळामंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या जाहीर सभेनंतर सिडको परिसरात घडलेल्या घटनेने राजकीय वातावरण तापले आहे. महाजन यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाचे महानगरप्रमुख प्रवीण ऊर्फ बंटी तिदमे यांचा अमली पदार्थ विक्रेत्यांशी संबंध असल्याचा दावा करून ते बांधकाम व्यावसायिकांना धमकावतात, असे आरोप करत एक चित्रफित दाखवत शिंदे गटाला धक्का दिला होता. हाच व्हिडिओ दाखवल्याच्या रागातून मंत्री महाजन यांचा ताफा अडवून शिवीगाळ केल्याप्रकरणी पिता-पुत्रासह एका महिलेविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा :  Nashik Politics : भाजप उमेदवार बडगुजरांच्या कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न; पोलिस छावणीचे स्वरूप

YouTube video player

सोमवारी (दि. १२) सायंकाळी सिडकोतील (Cidco) शिवाजी चौक येथे मंत्री महाजन यांची जाहीर सभा पार पडली. नेहमीच्या शैलीत बोलताना महाजन यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले. भाषणादरम्यान त्यांनी ड्रग्ज पेडलर्सशी संबंधित एक व्हिडिओ सभास्थळी दाखवला. या माध्यमातून विरोधकांचे अमली पदार्थ तस्करांशी संबंध असल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली होती. सभा आटोपल्यानंतर मंत्री महाजन यांचा ताफा मार्गस्थ होत असताना संशयित सुनील माधव पाटील (५२), त्यांचा मुलगा निशांत पाटील (२१, दोघे रा. देवदर्शन, बडदेनगर, सिडको) आणि शिल्पा मोराडे यांनी ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. ‘खोटी क्लिप दाखवून खोटा प्रचार करतात का?, आमच्या मुलांची बदनामी करता?’ असे म्हणत तिघांनी आरडाओरड करत शिवीगाळ केल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे.

हे देखील वाचा : Nashik MC Election : दुपारी साडे तीन वाजेपर्यंत नाशिकमध्ये ‘इतके’ टक्के मतदान; मतदारांच्या मतदान केंद्रांबाहेर रांगा

दरम्यान, अचानक झालेल्या या प्रकारामुळे बंदोबस्तावरील पोलिसांची (Police) धावपळ उडाली. मंत्री महाजन यांचा ताफा पुढे निघून गेल्यानंतरही संबंधितांनी शिवीगाळ व गोंधळ सुरूच ठेवला. याप्रकरणी पोलीस शिपाई केशव ढगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. दरम्यान, या घटनेचा तपास सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहेत. दरम्यान, महाजन आणि पाटील यांच्यातील बाचाबाचीचा व्हिडिओ विविध समाज माध्यमांवर व्हायरल होतो आहे.

हे देखील वाचा : Nashik Municipal Election : पहिल्या चार तासांत महापालिकेसाठी १४.३१ टक्के मतदान; मतदारांच्या मतदान केंद्रांवर रांगा

व्हिडिओतील मुलांविरुद्धही गुन्हा

महाजन यांनी प्रभाग २४ मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत दाखवलेल्या व्हिडिओनुसार अंबड पोलिसांनी दुसरा गुन्हा नोंदवला आहे. त्यानुसार, व्हिडिओमधील अनोळखी मुले अंमली पदार्थसदृश वस्तूचे सेवन करत असल्याचे निदर्शनास आले असून व्हिडिओतील मुलांविरुद्ध ‘एनडीपीएस’ कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...