Saturday, September 12, 2026
HomeनाशिकNashik MC Election : दुपारी साडे तीन वाजेपर्यंत नाशिकमध्ये 'इतके' टक्के मतदान;...

Nashik MC Election : दुपारी साडे तीन वाजेपर्यंत नाशिकमध्ये ‘इतके’ टक्के मतदान; मतदारांच्या मतदान केंद्रांबाहेर रांगा

आता उरला अवघा अर्धा तास

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिकेच्या १२२ जागांसाठी आज (दि.१५) रोजी सकाळी साडे सात वाजेपासून शहरातील विविध मतदान केंद्रांवर मतदान सुरु आहे. सकाळी साडे सात ते साडे नऊ वाजेपर्यंत ६.५१ टक्के मतदान झाले होते. यानंतर साडे अकरा वाजेपर्यंत शहरात १४.३१ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे दुपारी दीडपर्यंत ही आकडेवारी वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार दीड वाजेपर्यंत साधारणता ३० टक्के मतदान झाले होते. त्यानंतर आता दुपारी साडे तीन वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Municipal Election : पहिल्या चार तासांत महापालिकेसाठी १४.३१ टक्के मतदान; मतदारांच्या मतदान केंद्रांवर रांगा

नाशिकमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत ३९.६४ टक्के इतके मतदान झाले असून, मतदान केंद्रांवर आता मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी रांगा लागल्याचे बघायला मिळत आहे. शहरातील दत्तनगर, पंचवटी, यासह विविध भागांत मतदारांनी दुपारनंतर मतदानासाठी गर्दी केली आहे. यात महिलांची संख्या अधिक प्रमाणावर दिसून येत आहे. तर भद्रकाली परिसरातील दूध बाजारात मतदारांची गर्दी वाढल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

हे देखील वाचा :  Nashik Politics : भाजप उमेदवार बडगुजरांच्या कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न; पोलिस छावणीचे स्वरूप

मालेगावात ४६ टक्के मतदान

मालेगाव महानगरपालिकेसाठी पहिल्या चार तासात अवघे २०.९२ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे मतदान केंद्रावर सकाळी ११ वाजेपर्यंत शुकशुकाट दिसून आला. तर दुपारी दीड वाजेपर्यंत ३३.०५ टक्के मतदान झाले होते. यानंतर आता दुपारी साडे तीन वाजेपर्यंत ४६ टक्के मतदान झाले आहे. आता मतदानासाठी अवघा अर्धा तास उरला असून, बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी झाल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

BRICS

BRICS Summit 2026:’आम्ही कोणाच्याही विरोधात नाही’ BRICS परिषदेतून PM मोदींचा संदेश,...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित BRICS शिखर परिषदेत सहभागी झालेल्या परदेशी प्रतिनिधींचे स्वागत...