ओझे | वार्ताहर | Oze
दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) वणी येथील एका हिंदू मुलीला (Hindu Girl) मागील चार वर्षांपासून एक मुस्लिम युवक (Muslim Youth) मानसिक त्रास देत होता. या मुलीच्या कुटुंबाने कंटाळून वणी येथून नाशिकला स्थलांतर केले तरी देखील त्या मुलाचा व त्याच्या कुटुंबाचा मुलीचे आई-वडील व भावाला त्रास सुरूच राहिला.’माझ्याशी लग्न कर नाही तर तुझ्या आई वडीलांचा खून करू’, अशी धमकीही त्याने मुलीला दिली होती. त्यानंतर या प्रकरणाची तक्रार मुलीच्या आई-वडिलांनी भाजप नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार (Sunil Kedar) यांच्याकडे केली असता तातडीने चक्र फिरले व गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर केदार यांनी हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सदर मुलगी (Girl) हुशार असूनही केवळ भितीपोटी तिच्या आई-वडिलांनी तिला बारावीच्या परिक्षेला बसू दिले नाही. तसेच या युवकाच्या त्रासाला कंटाळून मुलीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता. परंतु, सुदैवाने त्यातून ती बचावली. या युवकाच्या कुटुंबांचा अवैध दारू व गुटख्याचा मोठा धंदा असून, केवळ भितीपोटी कुणीही स्थानिक व्यक्ती पुढे येत नाही. मात्र, सदर मुलीच्या आई-वडिलांनी भाजप नाशिक शहराध्यक्ष केदार यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, केदार यांनी या प्रकरणात वणी पोलीस ठाण्याचे (Vani Police Station) काही कर्मचारी सहभागी असून, गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पोलिसांनी त्या गुन्हेगाराला सावध करत त्याला परराज्यात पाठविल्याचा आरोप केला आहे. तसेच पोलीस ठाण्यातील गोपनीय माहिती व ब पत्र संशयित आरोपीच्या मोबाईलवर कोणी पाठवली व त्याने ही माहिती त्याच्या वडीलांना कशी मिळाली याची सखोल चौकशी करावी. याशिवाय सदर पोलीसाला त्वरित निलंबित करून त्याचीही चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. वणी परिसरात पोलिसांच्या मुक संमतीने अवैध धंद्यांना उत आला असून, जे पोलीस यामध्ये सहभागी असतील त्यांचीही चौकशी व्हावी, असेही सुनील केदारांनी म्हटले.




