नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक शहर सायबर पाेलिसांनी (Nashik City Cyber Police) शुक्रवारी (दि. १४) अंबड परिसरातील (Ambad Area) अश्विननगरात सुरु असलेले बेकायदेशिर काॅलसेंटर हुडकून काढत तरुणीसह आठ सायबर संशयितांना अटक केली हाेती. दरम्यान, हे काॅलसेंटर सुरु करण्यासाठी सायबर टाेळीने ‘सेफसाईड’ म्हणूण नाशिकची निवड केली. त्यातच ब्रॅन्डेड बूटांचा (शूज) माल भरुन नव्याने शू- मार्ट सुरु करण्याचे सांगत बंगला मालकाचा विश्वास संपादन करत दरमहा चाळीस हजार रुपये भाडे ठरविले हाेते, असे समाेर आले आहे. दरम्यान, अटकेतील आठही संशयितांकडे सखाेल तपास सुरु असून पसार झालेल्या दाेन मास्टरमाईंडच्या शाेधार्थ सायबर टीम रवाना झाल्या आहेत.
‘ॲपल आणि मायक्रोसॉफ्ट’ कंपन्यांच्या नावाने बनावट कॉल सेंटर चालवून अमेरिकेतील (America) दीडशे नागरिकांना जवळपास २ लाख ४० हजार डाॅलर अर्थात भारतीय चलनातील तब्बल दाेन काेटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीला अश्निन नगरातील भूमी अपार्टमेंटसमोर असलेल्या जानकी बंगल्यातून अटक केल्याची माहिती गुन्हेशाखेचे पाेलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी (दि. १६) पत्रकार परिषदेत दिली हाेती. कारवाईत प्रणय अनिरुद्ध जैस्वाल (वय ३०, रा. नालासोपारा, पालघर), साहिल खोकोन शेख (२४, रा. मालाड), मुकेश गजानन पालांडे (४०, रा. नालासोपारा), आशिष प्रभाकर ससाणे (२८, रा. सांताक्रुझ), चांद शिवदयाल बर्नवाल (२७, रा. मिरारोड, ठाणे), सादिक अहमद खान (२४, रा. मालवणी, मालाड) आणि समीक्षा शंकर सोनावले (२४,रा. खर्डीपाडा, ठाणे) या तरुणीसह संशयितांना अटक केली हाेती.
हे संशयित (Suspect) हे रात्री आठ वाजेनंतर काॅलसेंटरमधून अमेरिकेतल्या व्यक्तिंना फोन लावून ‘तुमच्या महागड्या कंम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये व्हायरसने अटॅक केला आहे. हा व्हायरस व बग रिपाेर्ट काढण्यासाठी तुम्हाला जवळच्या एका दुकानातून ‘गिफ्ट व्हाऊचर’ घ्यावे लागेल. साधारण दोनशे ते दोन हजार डॉलर्सपर्यंत व्हाऊचरची खरेदी करा’, असे सांगून जाळ्यात फसवित हाेते. संबंधित व्यक्तिने संशयितांच्या सांगण्यावरुन व्हाऊचर खरेदी केल्यावर हे संशयित ‘व्हीओआयपी’ क्रमांकावरुन संबंधिताला कॉल करुन व्हाऊचरचा क्रमांक नोंदवून संशयित साहू व शादाब यांना देत हाेते. त्यानंतर ‘व्हायरस क्लीन’ झाल्याचा दावा करण्यात यायचा. त्यातून संबंधितांची फसवणूक (Fraud) होत हाेती. तपास वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे करत आहेत.
केवळ स्क्रिप्ट वाचा
अटक केलेले संशयित सर्वसामान्य कुंटुंबातील असून त्यांना साहू व शादाब यांनी अस्सल इंग्रची भाषा वाचण्याचे व बाेलण्याचे प्रशिक्षण दिले हाेते. विशेष म्हणजे आठही संशयितांना केवळ स्क्रिप्ट वाचण्याची जबाबदारी देण्यात आली हाेती. त्यानुसार त्यांना दरमहा २५ ते ३० हजार रुपयांचा माेबदला वेतनस्वरुपात दिला जात हाेता. दरम्यान, या प्रकरणात आर्थिक व्यवहार कसे झाले, नागरिकांकडून उकळलेले पैसे काेणत्या बँक खात्यात वर्ग झाले, ते कसे विड्राॅल करण्यात आले, याचा तपास सुुरु झाला आहे.
मुद्दे
अटकेतील तरुणीची आई नाशकात
बंगल्यात स्वतंत्र स्वयंपाकी नेमला
महिनाभराचा किराणा व जेवण, नास्ता बनविण्याचे कामे ताे करत हाेता
साहू व शादाब नाशकातून पसार