Thursday, July 23, 2026
HomeनाशिकNashik Crime : नाशिकमधील 'या' हॉस्पिटलमध्ये एसीबीचा ट्रॅप; वैद्यकीय अधिक्षक महिलेसह तिघींवर...

Nashik Crime : नाशिकमधील ‘या’ हॉस्पिटलमध्ये एसीबीचा ट्रॅप; वैद्यकीय अधिक्षक महिलेसह तिघींवर गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महात्मा फुले जनआराेग्य याेजनेंतर्गत (Mahatma Phule Jan Arogya Yojana) शस्त्रक्रिया झाली असताना महिला रुग्णास डिस्चार्ज देण्यासाठी उपचार कालावधीत ५१ हजार रुपयांच्या लाचेची (Bribe) मागणी करुन त्यातील ३१ हजार रुपये स्विकारणाऱ्या पंचवटीतील नामको कॅन्सर हॉस्पिटलच्या (Namco Cancer Hospital) वैद्यकीय अधीक्षक महिलेसह कॅशिअरवर एसीबीने गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

हाॅस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डाॅ. विशाखा जहाँगिरदार, कॅशियर महिला व अन्य एक महिला अशी संशयितांची नावे आहेत. नाशिकमधील एका बीपीएल कुटुंबातील ४९ वर्षीय तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Department) तक्रार दाखल केली हाेती. त्याच्या पत्नीवर हॉस्पिटलमध्ये शासनाच्या वरील योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेसह रुग्णास डिस्चार्ज देण्यासाठी संशयित डाॅक्टर व स्टाफने लाच मागितल्याची तक्रार एसीबीला प्राप्त झाली.

दरम्यान, यानंतर पथकाने पडताळणी केली असता संशयितांनी वेगवेगळ्या कालावधीत संशयित स्टाफ व कॅशिअरने लाचेची रक्कम स्विकारल्याचे समाेर आल्याने गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातील साठा ‘किती’ टक्क्यांवर; मुळा धरणही निम्मे भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात मंगळवारनंतर बुधवारीही आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल...