Friday, September 20, 2024
Homeक्राईमNashik Crime News : दाेन हत्या उघड; मात्र आराेपी अद्यापही मोकाटच

Nashik Crime News : दाेन हत्या उघड; मात्र आराेपी अद्यापही मोकाटच

म्हसरुळ आणि पाथर्डी फाट्यावरील काेल्ड ब्लडेड मर्डर प्रकरण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

शहरात घडलेल्या दाेन महिलांच्या निर्घृण हत्याप्रकरणातील (Murder Case) मारेकरी शाेधण्यात पाेलिसांना (Police) अपयश आले आहे. म्हसरुळ येथील कुसुम एकबाेटे या वृद्धेची हत्या (Murder) हाेऊन (दि.९) ६२ दिवस अर्थात दाेन महिले उलटूनही मारेकरी तरुण अद्याप माेकाटच आहे. तर, इंदिरानगरच्या सदाशिव नगरात २९ ऑगस्ट राेजी घडलेल्या निशा नागरे हिच्या हत्येतीस संशयित मयूर नागरे हा सुद्धा परागंदा आहे. निशाचा खून हाेऊन १२ दिवस झाले असतानाच अद्याप तिच्या आई वडिलांसह कुटुुंबाचा थांगपत्ता पाेलिसांना काढता आलेला नाही.

हे देखील वाचा : Nashik Crime News : पंचवटीत तरुणाची हत्या; नाशिक पुन्हा हादरलं

दिंडाेरी राेडवरील (Dindori Road) गुलमाेहाेर नगरात १० जुलै राेजी कुसुम सुरेश एकबाेटे (वय ८०, रा. राधानंद निवास, स्वामी समर्थ केंद्राजवळ) या सकाळी दहा वाजता घरात असतांना त्यांच्या मानेवर धारदार विळ्याने खाेलवर वार करुन साेसायटीत राहणाऱ्या २२ वर्षीय सराईत तरुणाने (Youth) हत्या केल्याचे तपासात समाेर आले हाेते. पाेलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज, घरातील काही पुरावे व आजूबाजूच्या नागरिकांकडे तपास करुन महत्त्वाचे पुरावे संकलित केले हाेते. श्वानपथकानेही संशयिताचा माग काढला. पण, त्यात अपयश आले. अधिक तपासात ज्या धारदार विळ्याच्या सहाय्याने कुसुम यांच्या गळ्यावर वार करण्यात आले ताे विळा कुसुम यांच्या साेसायटीत राहणाऱ्या त्रेहस्त कुटुंबाच्या घरातील असल्याचे समाेर आले हाेते.

हे देखील वाचा : Nashik Crime News : पेठरोडला गोवंश तस्करीच्या संशयातून तिघांवर हल्ला

त्यानुसार पाेलिसांनी या कुटुंबाकडे (Family) तपास केंद्रीत केला, तेव्हा या कुटंबातील २२ वर्षीय तरुण घटनेनंतर पसार असल्याचे उघड झाले. त्यानुसार, त्याचा शाेध सुरु झाला असता पाेलिसांनी तांत्रिक विश्लेषणानुसार त्याचा माग काढला. त्यावरुन पथके हरसूल येथे पाेहाेचली. तेथेही संशयित मिळाला नाही. त्यानंतर या पथकासह अन्य पथके रिकाम्या हाती परत आली. पण, हा संशयित हरसूल, पेठ, सुरगाणा भागातील वस्ती, पाड्यांवर असल्याची माहिती तपास पथकांना मिळाली. त्यानुसार एक पथक गावात पाेहाेचले. पण, येथूनही सराईताने गुंगारा दिला.

हे देखील वाचा : Nashik News : फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल

त्यानंतर त्याचे लाेकेशन दुसऱ्या ठिकाणी ट्रेस झाले. त्यामुळे पथक (Squad) तेथे गेले आणि दाेन तीन दिवस थांबून रिकाम्या हाती नाशिक शहरात परतले. हा संशयित माेबाईल वापरत नसल्याचे समाेर येत असून या हत्याप्रकरणास साेमवारी(दि. ९) दाेन महिने उलटले आहेत. तरी, पाेलिसांना गुंगारा देण्यात संशयित वरचढ ठरला आहे. फरारी असलेला संशयित सराईत असून व्यसनी आहे. तसेच जेलवारी केल्याने त्याला गुन्ह्यानंतरच्या पळवाटा माहित आहे. त्यामुळेच ताे दाेन महिन्यांपासून पाेलिसांना गुंगारा देत आहे.

हे देखील वाचा : Nashik News : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मुस्लिम बांधवांचा पुढाकार; जुलूस मिरवणूक १६ सप्टेंबरला दोन तास अगोदर काढणार

या घटना अपवाद

मागील सहा महिन्यांत शहरात घडलेल्या खुनांच्या एकूण घटनांतील विविध संशयित, विधिसंघर्षित संबंधित पाेलीस ठाणे व इतर पथकांनी दाेन ते अडीच दिवसांत धुंडाळून काढत ताब्यात घेतले. मात्र एकबाेटे व नागरे हत्या प्रकरण याला अपवाद ठरले आहे. नागरे हत्या प्रकरणास १२ दिवस उलटूनही मारेकरी हाती लागत नसल्याने तीव्र संताप व्यक्त हाेताे आहे. दरम्यान, निशाच्या हत्येमागील मुख्य कारण समाेर आले नसून मयूर नागरेला अटक झाल्यावरच ते उघड हाेणार आहे. 

हे देखील वाचा : Nashik News : मनपा पथकाचा अवैध गर्भपात केंद्रावर छापा

निशाचा मृतदेह शवागारातच

पाथर्डी शिवारातील सदाशिवनगर येथील कृष्णा प्राइड अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये (दि.२९) संशयास्पद स्थितीत आढळलेल्या निशा मयुर नागरे (वय ३५) हिचा खून झाल्याचे शुक्रवारी (दि. ३०) वैद्यकीय अहवालातून निष्पन्न झाले. तर अधिक तपासासाठी तपास पथक पुणे येथे जाऊन रिकाम्या हाती परतले आहे. मृत निशाचा पती मयूर नागरे हा नांदूर नाका येथे राहणारा असून त्याच्या पत्नीसह कुटुंब, नातलगांकडेही चाैकशी झाली आहे. त्यात काहीही निष्पन्न झाले असून मयूरने फाेन स्विच ऑफ करुन ठेवला आहे. त्याचे लाेकेशन ट्रेस झालेले नाही. तर, दुसरीकडे पॅनकार्डच्या आधारे निशाची ओळख पटली असली तिचे आई वडील, कुटुंबाचा काेणताही पत्ता वा शाेध लागलेला नाही. त्यामुळे गेल्या १२ दिवसांपासून तिचा मृतदेह शवागारातच ठेवण्यात आला आहे. 

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या