Monday, December 2, 2024
Homeक्राईमNashik News : मनपा पथकाचा अवैध गर्भपात केंद्रावर छापा

Nashik News : मनपा पथकाचा अवैध गर्भपात केंद्रावर छापा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) आरोग्य विभागाच्या पथकाने (Health Department) शहरातील एका दवाखान्यात छापा (Raid) मारून अवैधरीत्या सुरू असलेले गर्भपात केंद्र उघडकीस आणले आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : पंचवटीत तरुणाची हत्या; नाशिक पुन्हा हादरलं

याबाबत अधिक माहिती अशी की, महात्मानगर सारख्या उच्चभ्रू वस्तीतील पांड्या हॉस्पीटलमध्ये (Pandya Hospital) हा प्रकार मागील कित्येक वर्षापासून सुरू होता. मनपाच्या वैद्यकीय पथकाच्या छाप्यात अनेक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. माता मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना ही गंभीर बाब निदर्शनास आली.

हे देखील वाचा : Nashik Crime News : पेठरोडला गोवंश तस्करीच्या संशयातून तिघांवर हल्ला

याठिकाणी गर्भपातासाठी (Abortion) वापरल्या जाणाऱ्या औषधांचा मोठा साठा आढळून आल्याने तत्काळ पंचनामा करत अवैध गर्भपात केंद्र चालविणाऱ्या डॉ. आर.एम. पंड्या यांच्याविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात (Gangapur Police Station) तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या