Monday, December 2, 2024
HomeनाशिकNashik News : फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल

Nashik News : फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik Pune Highway) असलेल्या शिंदे गाव येथील औद्योगिक वसाहतीतील एका फटाक्याच्या गोदामाला (Firecracker Godown) भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : पेठरोडला गोवंश तस्करीच्या संशयातून तिघांवर हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, देवळाली गावातील (Deolali Gaon) सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत शिवलाल विसपुते यांचा मुलगा गौरव विसपुते यांच्या मालकीच्या शिंदे गाव नायगाव रोड येथे श्री स्वामी समर्थ नावाचे फटाक्यांचे गोदाम आहे. आज मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास आकाशात धूर दिसू लागल्याने व फटाक्यांच्या आवाजामुळे रहिवाशांच्या आग लागल्याचे लक्षात आले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : पंचवटीत तरुणाची हत्या; नाशिक पुन्हा हादरलं

त्यानंतर सदर घटनेची माहिती तात्काळ नाशिकरोड अग्निशामक केंद्र व नाशिकरोड पोलिसांना (Nashik Road Police) देण्यात आली. यानंतर आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या