Wednesday, September 9, 2026
Homeक्राईमAshok Kharat Crime: 'अघोरी' पूजा, बनावट वाघ, प्लास्टिकचे साप अन्…; भोंदू खरात...

Ashok Kharat Crime: ‘अघोरी’ पूजा, बनावट वाघ, प्लास्टिकचे साप अन्…; भोंदू खरात आणि ‘काळ्या बाहुल्यां’चा खेळ

नाशिक | प्रतिनिधी
‘अघोरी’ पूजा, बनावट वाघ, प्लास्टिकचे साप आणि गर्भावस्थेत असलेल्या महिलांचे लैंगिक शोषण… हे एखाद्या थरारपटाचे कथानक नसून नाशिकच्या ‘भोंदू’ अशोककुमार एकनाथ खरात याच्या पापकर्मांचा पाढा आहे. दोन गुन्ह्यांत आधीच अटकेत असलेल्या खरातला आता तिसऱ्या गुन्ह्यात न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, तपासाचा रोख आता त्याच्या ‘कॅश टू व्हाईट’ मनी लॉड्रिग आणि मानवी तस्करीसारख्या गंभीर वळणांकडे वळला आहे.

संशयित खरातने कार्यालयीन कर्मचाऱ्याच्या ७ महिन्यांच्या गर्भवती पत्नीस ‘दुष्ट शक्तींपासून संरक्षण’ देण्याच्या नावाखाली कार्यालयात बोलावले. मुलाचाच जन्म होईल असे आमिष दाखवून, श्रद्धेच्या नावाखाली त्याने त्या महिलेवर अनन्वित लैंगिक अत्याचार केले. केवळ शारीरिक शोषणच नव्हे, तर पीडितेचे अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल केल्याचा संशयही एसआयटीने व्यक्त केला आहे.

- Advertisement -

Ashok Kharat Crime: १६० जीबीची ‘खरात फाईल्स’ SIT च्या ताब्यात; ‘रत्न’ पुरवणाराही रडारवर

खरात केवळ भोंदूगिरी करत नव्हता, तर त्याने दहशतीचे एक ‘सेटअप’ तयार केले होते. मिरगाव येथील ईशान्येश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या नावाखाली तो लोकांची फसवणूक करत होता, असे न्यायालयाला सांगून पोलिस कोठडीची मागणी केली. मंदिरात प्लास्टिकचे साप आणि कापडी वाघ ठेवून तो भाविकांमध्ये भीती निर्माण करत होता. या भीतीचा फायदा घेऊन त्याने भाविकांकडून कोट्यवधी रक्कम उकळली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ट्रस्टच्या बँक खात्यांचा वापर त्याने काळा पैसा पांढरा करण्यासाठी केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

गुंगीकारक औषधे, ‘कंटेन्मेंट’चा संशय
खरात महिलांची शुद्ध हरपण्यासाठी आपल्या युरिनमध्ये विशिष्ट गुंगीकारक पदार्थ आणि द्रव पाजत होता. हे पदार्थ तो कोठून मिळवत होता आणि यामध्ये त्याला औषध क्षेत्रातील कोणाचे सहकार्य लाभले आहे का, याचा शोध एसआयटी घेत आहेत. चिंचोके आणि बनावट खडे यांना ‘मंत्रून’ देण्याच्या नावाखाली तो लाखो रुपये उकळत असल्याचेही तपासात उघड झाले आहे.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप पुरस्काराने गौरव

0
मुंबई | वृत्तसंस्था जगभरातील नेत्यांच्या आवाजाने दुमदुमलेल्या ब्रिटनच्या संसदेतील वरिष्ठ सभागृह हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये आज ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. निमित्त होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना...