Thursday, March 13, 2025
Homeक्राईमNashik Crime : पानटपरीतून खुलेआम भांगविक्री; परप्रांतीयाकडून स्थानिक विक्रेत्यांना पुरवठा

Nashik Crime : पानटपरीतून खुलेआम भांगविक्री; परप्रांतीयाकडून स्थानिक विक्रेत्यांना पुरवठा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरात एमडी ड्रग्ज (MD Drugs) आणि गांजा व चरसच्या बिनदिक्कत तस्करीनंतर आता मुबलक प्रमाणात भांगेच्या गोळ्यासुद्धा पानटपरीतून विक्री केल्या जात आहे. काही उत्तर भारतीय संशयित नाशिक शहरातील (Nashik City) काही तरुणांना हाताशी धरुन भांग (Cannabis) विक्रीसाठी जम बसवत आहे. शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने भद्रकाली परिसरात कारवाई करुन भांग विक्रीच्या प्रयत्नातील पानटपरीचालक संशयित योगेश डोईफोडे याला मंगळवारी (दि. २८) ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून तीन हजार तीनशे रुपयांच्या भांग गोळ्यांची पाकिटे हस्तगत केली आहेत. भद्रकाली पोलीस ठाण्यात डोईफोडेसह त्याला भांगेचा पुरवठा करणाऱ्या पवनकुमार दुबे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपूर्वी एमडी ड्रग्जची मुंबई-व्हाया पुणे आणि नाशिकमध्ये (Pune to Nashik) तस्करी केल्यासंदभनि मुंबईनाका व अन्य पोलीस ठाण्यांत एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे नोंद आहेत. पथकाने नुकत्याच तीन कारवाया करत चरस आणि एमडीची तस्करी करणाऱ्यांना जाळ्यात ओढले होते. त्यात रोहित नंदकुमार पवार (वय २८, रा. चेतनानगर) व बाबू प्यारेलाल कनोजिया (३५, रा. हेगडेवारनगर) हे दोघे सराईत मुंबईतून (Mumbai) हे ड्रग्ज नाशकात आणून एका माचिस बॉक्समध्ये (काडीपेटी) लपवून एमडीची तस्करी व विक्री करत होते, असे समोर आले होते.

तसेच पथकाने (दि. ११) मुंबई नाका परिसरात एका पुरुषासह तीन महिलांना अटक करुन त्यांच्याकडून ७५.५ ग्रॅम ‘एमडी’ जप्त केले होते. यात गणेश कैलास गिते (वय ४५, रा. मखलमलाबाद), ऋतुजा भास्कर झिंगाडे (२२, रा. शिवाजी पार्क, सातपूर), स्विटी सचिन अहिरे (२८, रा. श्रीधर कॉलनी, पेठरोड), पल्लवी निकुंभ उर्फ सोनाली शिंदे (३६, रा. साईनगर, अमृतधाम) या ड्रग्ज पेडलरचा समावेश होता. या केमिकल नशेच्या गुन्ह्यांतील संशयितही ‘ड्रग्ज’च्या आहारी गेले असल्याने त्यांच्या हातावर इंजेक्शन टोचवून घेतल्याचा जखमाही आढळल्या होत्या. आता या ड्रग्जपाठोपाठ नाशकात चरस आणि गांजाची तस्करी व विक्री सुरु असतानाच पुन्हा नव्याने भांगेच्याही गोळ्या विक्री होत असल्याचे समोर आले आहे.

ऑनलाईन विक्री

भांगेच्या या गोळ्या विविध पानटपरीतून चोरीछुप्या पद्धतीने विक्री होत असतानाच, कारवाईत जप्त केलेल्या भांगेच्या पाकिटावर आढळलेल्या नावानुसार, या भांगेची विविध संकेतस्थळांवरुन ऑनलाईन विक्री सुरु असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याच नावासह आयुर्वेदिक औषधी नावाने आर्डर केल्यास १०० गोळ्या १ हजार ९९ रुपयांत नमूद पत्त्यावर डिलिव्हर केले जात असल्याचे समोर येते आहे. तर, टपरीचालक डोईफोडेला स्वस्तात भांग आणून देणाऱ्या परप्रांतीय पवनकुमार दुबेचा शोध सुरु झाला आहे. त्याला ताब्यात घेतल्यावरच पुढील साखळीचा उलगडा होणार आहे.

अशी झाली कारवाई

संशयित पानटपरीचालक योगेश संतोष डोईफोडे (वय २७, रा. गंगा हाईट्स, गणेशनगर, तपोवन, पंचवटी) हा मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता भद्रकालीतील शिवशक्तीचौकातील संतोष पानटपरीतून मिक्स गुटख्यासह सीलबंद पाकिटांतून भांगेच्या गोळ्या विक्री करत होता. ही माहिती एनडीपीएस पथकाचे (NDPS Squad) हवालदार बळवंत कोल्हे यांना मिळाली. त्यांनी वरिष्ठांना माहिती दिल्यावर पथकाने सापळा रचून कारवाई करत योगेशला ताब्यात घेतले. त्याच्या पानटपरीत ३ हजार ३२५ रुपयांच्या ‘तुफानी मदन मोदक वटी’ या पाकिटांत भांगेच्या गोळ्या आढळून आल्या. हवालदार एस. व्ही. शेळके तपास करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...