Thursday, April 9, 2026
Homeक्राईमNashik Crime : विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; चौघांविरूद्ध गुन्हा, पतीला अटक

Nashik Crime : विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; चौघांविरूद्ध गुन्हा, पतीला अटक

मानूर | वार्ताहर | Manur

कळवण येथील उपजिल्हा रुग्णालय (Kalwan Hospital) वसाहतीत राहणाऱ्या ३१ वर्षीय पूजा सुरज छजलानी या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला असून, माहेरच्या मंडळींनी पतीसह सासरच्या कुटुंबातील व्यक्तींवर संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात (Kalwan Police Station) पती, सासू, नणंद आणि पतीच्या कथित प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पूजा छजलानी हिचा विवाह २५ नोव्हेंबर २०१३ रोजी कळवण येथील रहिवासी सुरज छजलानी यांच्याशी शिर्डी येथे झाला होता. लग्नानंतर काही दिवसातच घरकाम येत नाही आणि लग्नात मानपान दिला नाही, या कारणावरून पती (Husbend) सुरज याने पूजाचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. माहेरच्यांनी वेळोवेळी आर्थिक मदत करूनही हा छळ थांबला नाही. दरम्यान, पतीचे नाशिकमधील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे पूजा छजलानीच्या निदर्शनास आले होते. याबाबत जाब विचारला असता जीवे मारण्याची आणि माहेरच्यांना संपवण्याची धमकी देण्यात आली होती.

यानंतर ३० जानेवारी २०२६ रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास कळवण येथील राहत्या घरी पूजा जळालेल्या अवस्थेत आढळली. शेजारी राहणाऱ्या अमोल गोयर यांनी पूजा यांच्या पालकांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पूजाला अधिक उपचारासाठी तातडीने नाशिक व नंतर नॅशनल बर्न सेंटर, ऐरोली (मुंबई) येथे हलवण्यात आले होते. मात्र, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास पूजाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. पूजा यांच्या मृत्यूनंतर भाऊ आणि बॉबी अशोक राजपाल यांच्या फिर्यादीवरून कळवण पोलीस ठाण्यात पती, सासू, नणंद व सुरज छजलानीच्या प्रियसी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०८, ८५, ११५(२), ३५२, ३५१ (३) ३ (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, कळवण पोलिसांनी (Police) पती सुरज छजलानी यास अटक (Arrested) केली असून, मंगळवारी न्यायालयात हजर केले असता सुरजला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे आणि पोलीस हवालदार प्रशांत तिडके, पुंडलिक डंबाळे, रामदास गवळी, पोपट महाले, पंकज शेवाळे, अशोक ठाकरे करत आहेत. या घटनेमुळे कळवण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

व्हिएतनामची कंपनी राज्यात साडेसहा अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai शाश्वत नागरी विकास, औद्योगिक आणि पर्यटन वृद्धी, नवीकरणीय ऊर्जा क्षमता आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात व्हिएतनाममधील विन ग्रुप जॉईंट स्टॉक कंपनी महाराष्ट्रात...