Friday, May 1, 2026
HomeनाशिकNashik Crime : आमदाराच्या पुतण्यावर गुन्हा; चौकशीत आढळला बनावट दाखला

Nashik Crime : आमदाराच्या पुतण्यावर गुन्हा; चौकशीत आढळला बनावट दाखला

भद्रकाली पोलीस घेणार ताबा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांचा पुतण्या देवेंद्र गुरुदेव कांदे याच्या ‘गुरुकृपा एंटरप्रायजेस’ वर नाशिक जिल्हा परिषदेने (Nashik Zilla Parishad) भद्रकाली पाेलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा (Fraud Case) नोंदविला आहे. जिपच्या बांधकाम विभागाने संशयित देवेंद्र याच्या बेकायदेशिर कामकाजाची कुंडली काढून फिर्याद नोंदविली आहे. त्यानुसार, भद्रकाली पोलीस देवेंद्रचा ताबा घेण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषदेचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रदीप रतन आहिरे यांनी सरकार पक्षाच्या वतीने फिर्याद नोंदविली आहे. त्यानुसार, जुलै २०१७ मध्ये बांधकाम शाखा व इवद कार्यालयाने नोंदणीकृत बांधकाम ठेकेदारांच्या यादीतील वर्ग-५ (५० लाखांपर्यंतची कामे) करण्याचे प्रमाणपत्र गुरुकृपा एंटरप्रायजेसचे प्राेप्रायटर देवेंद्र गुरुदेव कांदे (रा. तामसवाडी, ता. निफाड) यांना बहाल केले होते. दरम्यान, देवेंद्र यांनी हे प्रमाणपत्र काढण्यासाठी सादर केलेली सर्व मूळ कागदपत्रे सत्य असून असत्य आढळल्यास व्यकीश: जबाबदारी राहील, असे प्रतिज्ञापत्र दिले होते. त्यानंतर प्रमाणपत्र मिळताच त्यांनी विविध शासकीय कामे घेऊन ती केली आहेत.

दरम्यान, आमदार सुहास कांदे यांनी १७ ऑगस्ट २०२५ रोजी लेखी पत्र देऊन गुरुकृपा कन्स्ट्रक्शनच्या परवाना व त्या संबंधातील कागदपत्रांची मागणी केली होती. ही कागदपत्रे मिळाल्यावर आमदार कांदे यांनी पिंपळगाव बसवंत कृषि उत्पन्न बाजार समितीकडे हा बांधकाम परवाना व अन्य कामांचे दाखले तसेच कागदपत्रे बनावट आहेत की खरे आहेत, याची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, वरील विविध शासकीय यंत्रणांनी कागदपत्रे, दाखल्यांची सत्यता पडताळली. त्यात देवेंद्र कांदे यांनी पूर्णत्वामधील कामांची बांधकामे (Constructions) केलेली नाहीत. ठेकेदार नोंदणी प्रमाणपत्र बनविण्याकरीता सादर केलेले दाखले व इतर कागदपत्रे बनावट पद्धतीने सादर करुन नोंदणी प्रमाणपत्र घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांनी बनावटगिरी करुन फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद असून, तपास सुरु आहे.

ताज्या बातम्या

मिसिंग

Mumbai-Pune Missing Link: मिसिंग नव्हे तर ‘कनेक्टिंग लिंक’, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई-पुणे...

0
पुणे | Puneमुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील अंतर कमी करणाऱ्या आणि प्रवासाचा वेग वाढवणाऱ्या बहुप्रतिक्षीत 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे आज दिमाखात लोकार्पण झाले. मुख्यमंत्री...