Saturday, June 20, 2026
HomeनाशिकNashik Crime : विकृतीचा कळस! पत्नीचे आक्षेपार्ह चित्रण मित्रांना दाखवले; पाच जणांविरुद्ध...

Nashik Crime : विकृतीचा कळस! पत्नीचे आक्षेपार्ह चित्रण मित्रांना दाखवले; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

विवाह म्हणजे विश्वासाचे नाते. मात्र, एका नराधम पतीने या नात्याला काळिमा फासण्याचा प्रकार केला. पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ मित्रांना कॉलवर दाखवणाऱ्या विकृत पतीसह तिचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आर मॉलसमोर राहणाऱ्या सासरच्या पाच जणांविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात (Bhadrakali Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार २०१४ पासून नोव्हेंबर २०२५ पर्यंत सुरू होता, असे फिर्यादीत नमूद आहे.

- Advertisement -

संशयितांनी सुरुवातीला फिर्यादीच्या माहेरच्या लोकांचा विश्वास संपादन केला आणि खोटी माहिती देऊन लग्न (Marriege) करवून घेतले. लग्नानंतर पतीचे व्यसन सोडवण्यासाठी सासूसह इतरांनी वारंवार पैशांची मागणी केली. पैसे न दिल्याने गरीब घरची सून मिळाली असे टोमणे देत तिचे स्त्रीधन काढून घेण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे संशयित पतीने विकृतीचा कळस गाठून स्वतःच्या मित्रांना व्हिडिओ कॉल (Video Call) करून पीडितेचे चित्रण दाखवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

तर घरात कोणी नसताना तिच्या दिराने फिर्यादीकडे एकटक बघून, शरीराला स्पर्श करत विनयभंग केला. क्षुल्लक कारणावरून संशयितांनी वेळोवेळी मारहाण करून अतोनात छळ केला. अनेक महिने, वर्षे हा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन केल्यानंतर पीडितेने अखेर पोलिसांत (Police) धाव घेतली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Trimbakeshwar Rain : त्र्यंबकेश्वरला पावसाची जोरदार हजेरी; उकाड्याने हैराण झालेल्या...

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar गेल्या अनेक दिवसांपासून चातकासारखी पावसाची (Rain) वाट पाहणाऱ्या त्र्यंबकवासीयांना अखेर आज मोठा दिलासा मिळाला आहे. त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे आज (शनिवारी)...