नाशिक | प्रतिनिधी | Nashik
देवळाली विधानसभा मतदारसंघातील (Deolali Assembly Constituency) मतदार संख्येबाबत चुकीची माहिती सोशल मीडियावर (Social Media) प्रसारित केल्याप्रकरणी राजकीय विश्लेषक संजय कुमार (लोकनीती, सीएसडीएस नवी दिल्ली) यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळाली मतदारसंघ, नाशिक नायब तहसीलदार, प्रविणा शेखर तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संजय कुमार (Sanjay Kumar) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ११ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९.३५ वाजता देवळाली मतदारसंघातील मतदारसंख्येबाबत (Regarding the Number of Voters) चुकीची आकडेवारी प्रसिद्ध केली.
त्यात लोकसभा मतदार संख्या ४,५६,०७२ आणि विधानसभा (Vidhansabha) मतदारसंख्या २,८८,१४१ अशी नमूद करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात सदर मतदार संख्या लोकसभा २,७६,९०२ आणि विधानसभा २,८८,१४१ इतकी आहे. त्यामुळे मतदार संख्येबाबत खोटी व दिशाभूल करणारी माहिती पसरवण्यात आली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.




