नाशिक | प्रतिनिधी | Nashik
इंटरनेटच्या माध्यमातून स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन चाईल्ड पोर्नोग्राफीचे (Child Pronography) व्हिडीओ, फोटो विविध समाजमाध्यमांवर अपलोड करणाऱ्या नाशिकमधील संशयितांची यादी एनसीआरबीकडून नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यास (Nashik Cyber Police Station) प्राप्त झाली आहे. त्यानुसार, संशयितांच्या इथंभूत माहितीसह संशयितांनी अपलोड केलेल्या कंटेंट्सुसार सायबर पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत आयटी ॲक्ट्नुसार गुन्हा नोंदवून कार्यवाही सुरु केली आहे. चाईल्ड पोर्नोग्राफीच्या विरोधात केंद्राच्या गृह खात्याने कठोर पावले उचलली आहे.
अल्पवयीनांचे वैयक्तिक व न्यूड फोटो व व्हिडीओज प्रसारित करणे कायद्यान्वये गंभीर गुन्हा असून आतापर्यंत नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात ४० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तर आता पुन्हा एमसीएमईसी या संस्थेने केंद्र सरकारच्या नॅशनल क्राईम रेकॉर्डब्युरो (एनसीआरबी) व विविध राज्यांच्या मदतीने बेपत्ता मुलेमुली आणि लैंगिक अत्याचारास बळी पडलेल्या पीडित मुलींच्या उद्धाराकरिता मानसेवी काम हाती घेत विविध सोशल मीडिया साईटस्, डार्कवेब, फेसबुक, आणि अन्य यूआरएलचा अभ्यास करून संशयित हैंकर, सोशल मीडिया यूजर आणि अल्पवयीनांसंबंधीचे व्हिडीओ, फोटो चोरीछुप्या पद्धतीने अपलोड करणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत केले, संशयितांचा ठावठिकाणा, त्यांनी केलेले गंभीर गुन्हे उघड केले आहेत. यात नाशिकमधील फेसबुक व अन्य यूजर्सन सन २०२२ ते २०२३ या कालावधीत अल्पवयीन मुलामुलींचे न्यूड फोटो, व्हिडीओ आणि लैंगिक अत्याचारासंबंधीचे डिजिटल कंटेट सोशल मीडियावर अपलोड केले. त्याची माहिती कळताच एनसीएमईसीने एनसीआरबीला दिली.
दराम्यान, संशयित नाशिक शहरातील (Nashik City) असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचा डेटा पुराव्यांसह गोपनीयरित्या शहर सायबर पोलिसांना पाठविण्यात आला. त्यानुसार हे गुन्हे नोंदवून तपास सुरु करण्यात आला आहे, संशयित युजर्सची माहिती, आयपी ड्रेस, शेअर केलेला कन्टेट यासंदर्भातील सर्व पुरावे ‘एनसीआरबी ने शहर पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार सायबर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६७ (ब) अन्वये गुन्हे नोंदविले आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार ईश्वर सुरवाडे यांनी फिर्याद दिली.