Thursday, March 13, 2025
Homeक्राईमNashik Crime : गंधर्वनगरीतील तो खून नव्हे! दिव्यांग मुलाचा मृत्यू नैसर्गिक

Nashik Crime : गंधर्वनगरीतील तो खून नव्हे! दिव्यांग मुलाचा मृत्यू नैसर्गिक

अनैसर्गिक अत्याचारही निष्पन्न

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

उपनगर येथील गंधर्वनगर परिसरातील निर्माणाधीन इमारतीच्या पाणी साचलेल्या खड्ड्यात संशयास्पद (Suspicious) अवस्थेत आढळलेल्या आठ वर्षीय दिव्यांग मुलाच्या (Disabled Boy) मृत्यूचे (Death) गूढ उकलले आहे. पतंग खेळताना इमारतीवरुन खाली पडल्याने जबर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा खून नसल्याचे निष्पन्न झाले असून, एका विधीसंघर्षित मुलाने या बालकावर अनेकदा अनैसर्गिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार, पोलिसांनी संशयित मुलाला ताब्यात घेऊन चौकशी पूर्ण केल्याचे समजते. त्याच्याविरोधात लवकरच दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे.

- Advertisement -

रविवारी (दि.१९) आठ वर्षीय बालकाचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह (Dead Body) निर्माणाधीन इमारतीच्या खड्ड्यात आढळून आला होता. घटनास्थळी झोन एकच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, नाशिकरोड विभागाचे सहायक आयुक्त सचिन बारी, उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे, सहायक निरीक्षक नरेंद्र बैसाने व गुन्हे शोधपथक आले होते. पोलीस पथकाने पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय चाचणीसाठी जिल्हा रुग्णालयात (District Hospital) दाखल केला होता. सोमवारी (दि. २०) शवविच्छेदन करण्यात आल्यावर बालकाच्या छातीतील बरगड्या (फासळ्या) तुटल्याने व त्याच्या अज्ञानतेचा गैरफायदा घेत अज्ञात व्यक्तीने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला होता.

त्यानुसार, पोलिसांनी (Police) आकस्मिक मृत्यूच्या (Accidental Death) नोंदीचा तपास करतानाच अज्ञात संशयितावर खुनाच्या कलमासह पोक्सोअन्वये गुन्हा दाखल केला होता. या सखोल तपासांत व चौकशीत परिसरातीलच एका अकरा वर्षीय मुलाने या लहान बालकावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे समोर आले. त्यानुसार मुलाला ताब्यात घेऊन बालन्याय मंडळासमोर हजर करण्यात आले. तर पुढील सखोल तपास सुरु आहे.

चौकशी व सीसीटीव्हीमुळे उलगडा

मृत मुलगा दिव्यांग होता,घटनेपूर्वी तो पतंग खेळण्यासाठी घराजवळीलच इमारतीवर गेला होता. पतंग उडवताना किंवा पकडतांना तोल जाऊन तो खड्‌ड्यात पडला. गंभीर दुखापतीमुळे तो गत प्राण झाला आहे, असे सीसीटीव्हीसह तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले असून घातपाताचा संशय आणि शक्यता फेटाळून लावली आहे. तर तपास वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...