Thursday, May 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Crime : गुन्ह्यांच्या सावटाखाली नगरसेवक; कमलेश बोडकेंवर अपहरणानंतर आता मारहाण, धमकीचा...

Nashik Crime : गुन्ह्यांच्या सावटाखाली नगरसेवक; कमलेश बोडकेंवर अपहरणानंतर आता मारहाण, धमकीचा गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिका निवडणुकीसाठी (NMC Election) १६ जानेवारीला झालेल्या मतमोजणीत (Vote Counting) शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार कमलेश मोहन बोडके (Kamlesh Bodke) हे पंचवटीतील प्रभाग पाचमधून नगरसेवकपदी निवडून आले. मात्र, निवडणूक प्रचार काळात घडलेल्या व त्यानंतर समोर आलेल्या काही गंभीर घटनांसह गुन्ह्यांच्या नोंदींमुळे बोडके अडचणीत सापडले आहेत.

- Advertisement -

‘निवडणूक काळात तू नाशिकला का आला होतास’ असे म्हणत एका व्यक्तीस जबर मारहाण करून ‘आता जर नाशिकमध्ये दिसलास तर गेमच करतो’ अशी धमकी नगरसेवक संशयित बोडके यांनी दिल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानुसार जानेवारीनंतर फेब्रुवारीतही बोडकेंसह साथीदारांवर पंचवटीत दुसरा गंभीर गुन्हा नोंद झाल्याने खळबळ उडाली आहे. अरुण काशिनाथ धात्रक (५१, रा. नळवाडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार ते ७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी पत्नीसह छ. संभाजीनगर रोडवरील निलगिरी बागेत असलेल्या मंगलमूर्ती लॉन्समध्ये आप्तेष्टांच्या विवाहासाठी आले होते.

हे देखील वाचा : Pravin Tidme : उपमुख्यमंत्री शिंदे ते वरिष्ठ पदाधिकार्‍यांकडून मनधरणी अन् निर्णय बदलला; पत्रकार परिषदेत तिदमेंनी सगळंच सांगितलं

त्यावेळी संशयित कमलेश बोडके, ऋषभ दिघे, नीलेश घुगे, गोकुळ बोडके व इतर दोन संशयित आले. त्यांनी ‘तू निवडणूक काळात नाशिकला का आला होता’ असा जाब विचारत शिवीगाळ केली आणि तोंडावर, पाठीवर, पोटावर मारहाण केल्याचा दावा केला आहे. मारहाणी दरम्यान जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. त्यानुसार बोडकेंसह इतरांवर गुन्हा दाखल झाला असून संशयितांचा शोध सुरू आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कमलेश यांचे वडील मोहन यांचे निधन झाले आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवकपदी निवड झाल्यानंतर गंभीर आरोप व दावे समोर आल्याने पंचवटीतील राजकीय वातावरण तापले आहे.

मतदानाच्या आदल्या रात्री गुन्हा

जानेवारी महिन्यातील निवडणूक काळात ‘विरोधात प्रचार करतो’ या कारणावरून अपहरण व मारहाणीचा प्रकार घडला होता. तेव्हा बांधकाम व्यावसायिक मनोज भगीरथ मुंडावरे यांनी बोडकेंसह इतरांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. १४ फेब्रुवारी रोजी पेठरोड येथील कुमावतनगरात संशयित कमलेश बोडके, नितीन शेळके, नीलेश घुगे, मयूर बोडके, ऋषभ दिघे व इतर संशयितांनी हुज्जत घालून ‘तू माझ्याविरोधात प्रचार करतोस का, तुला सहा महिने फिरू देणार नाही’ असे म्हणत त्यांना घराबाहेर ओढून कारमध्ये बसवत अपहरण केल्यावर मारहाण केली. नंतर ड्रीम कॅसजवळील कोपऱ्यावर उतरवून दिल्याचे फिर्यादीत नमूद होते

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नीट पेपरफुटीतील मुख्य एजंट राहुरीचा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar देशभरात गाजत असलेल्या नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. सीबीआयच्या पथकाने नाशिक येथील शुभम...