Saturday, April 4, 2026
Homeक्राईमNashik Crime : ई-माेपेडच्या चाेरीत 'हेराफेरी'; खासगी सुरक्षा रक्षकाचा प्रताप

Nashik Crime : ई-माेपेडच्या चाेरीत ‘हेराफेरी’; खासगी सुरक्षा रक्षकाचा प्रताप

पाच हजारांत खरेदी केली ओला माेपेड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नव्वद हजार रुपयांची ई-माेपेड (E-Moped) केवळ पाच हजार रुपयांत खरेदी करुन पंधरा हजार रुपयांत विक्री करणाऱ्या खासगी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाचा प्रताप शहरात उघड झाला. ई-माेपेड विक्री करणाऱ्या ओला कंपनीच्या शोरुमसह कार्यपद्धतीमुळे नाशिककर (Nashik) त्रासले असताना येथील पार्ट व स्कूटर चोरी होत आहेत. त्यापैकी तीन ई-माेपेड विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सुरक्षारक्षकाला गुन्हे शाखा युनिट दोनने अटक केली आहे. योगेश परशराम शिंदे (वय २९, रा. श्रीकृष्णनगर, श्रमिकनगर) असे संशयिताचे (Suspected) नाव आहे. त्यानुसार चोरीतील मुख्य सूत्रधारासह इतर साथीदारांचा शोध सुरु आहे.

- Advertisement -

संशयित शिंदे याला एका व्यक्तिने तीन ई-स्कूटर अवघ्या पंधरा हजार रुपयांत विक्री केल्या. या ई-स्कूटर त्याने प्रत्येकी पंधरा हजार रुपयांत विक्रीचा डाव रचला. त्यावेळी एका ग्राहकाला शिंदे याच्यावर संशय आल्याने त्याने पोलिसांना माहिती दिल्यावर शिंदेचा कारनामा उघड झाला. त्याच्याकडून २ लाख ७० हजार मूळ किमतीच्या तीन ई-स्कूटर जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, सातपूर येथील वर्कशॉप व गोदामातून ई-स्कूटर चोरी झाल्यासंदर्भात कंपनीच्या सर्व्हिस मॅनेजरने सातपूर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलीस आयुक्तालयाने (Police Commissionerate) गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी व सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या पथकाला तांत्रिक तपासाद्वारे संशयिताचा माग काढण्याचे आदेश दिले. तोडकर यांचे पथक गस्तीवर असताना अंमलदार मनोहर शिंदे व महेश खांडबहाले यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार धर्माजी कॉलनी बसस्टॉपजवळील आदित्य कॉम्प्लेक्स पार्किंगमध्ये ई-स्कूटर संशयास्पदरित्या दिसल्या. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक डॉ. समाधान हिरे, सहाय्यक उपनिरीक्षक संजय सानप आदींनी संशयिताला अटक केली. त्याने एका व्यक्तिमार्फत या ई-स्कूटर ताब्यात घेतल्याची माहिती दिली. 

पासवर्ड नसल्याने विक्री

आरटीओ पासिंग नसलेल्या शोरुममधील नवीन ई-स्कूटर कवडीमोल किंमतीत मिळाल्या परंतु, त्याचा ‘पासवर्ड’ माहिती नसल्याने वापर करता येत नव्हता. त्यामुळे संशयित शिंदे हा बऱ्याच ठिकाणी ‘पासवर्ड’ उघडण्यासाठी प्रयत्न करीत होता. अखेरीस त्याने पाच हजारांत घेतलेली स्कूटर पंधरा हजारांत विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्याने ओळखीतल्या व परिसरातील नागरिकांना त्याची माहिती दिली. त्यानुसार एका ग्राहकाने स्कूटर खरेदीची तयारी दर्शवली. स्कूटरची पासिंग झालेली नाही, पासवर्ड उघडत नसल्याने त्याने ही माहिती पोलिसांना दिली. 

ताज्या बातम्या

Ashok Kharat Crime : भोंदू खरातचा बँकिंग ‘विळखा’; १०० संशयास्पद खाती,...

0
शिर्डी | Shirdi भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या कारनाम्यांची व्याप्ती आता बँकिंग क्षेत्रापर्यंत पोहोचली असून, राहाता (Rahata) येथील समता पतसंस्थेत ५७ व्यक्तींच्या...