Thursday, July 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRohit Pawar: भोंदू खरात ऑस्ट्रेलिया, दुबईसह चार पाच देशात…; रोहित पवारांचा गंभीर...

Rohit Pawar: भोंदू खरात ऑस्ट्रेलिया, दुबईसह चार पाच देशात…; रोहित पवारांचा गंभीर आरोप, म्हणाले, भ्रष्ट राजकीय नेत्यांचे…

मुंबई | Mumbai
स्वतःला अध्यात्मिक गुरू म्हणवून घेणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या पापाचा घडा आता भरत चालला असून, त्याच्याविरोधात आतापर्यंत १२ गुन्हे दाखल झाले आहेत. भोंदू अशोक खरातची एसआयटीद्वारे चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या भोंदू अशोक खरातबरोबर राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांचेही फोटो समोर आले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणावरून दररोज राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी खळबळजनक आरोप केलाय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अशोक खरात प्रकरणी गंभीर आरोप केला असून भोंदू खरात ऑस्ट्रेलिया, दुबई यासह चार पाच देशात हवालाच्या माध्यमातून ‘मनी लाँड्रिंग’ करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर या प्रकरणाची ईडी सारख्या केंद्रीय यंत्रणांनी तातडीने चौकशी करावी, अशी मागणी पवारांनी केली आहे.

- Advertisement -

अंजली दमानिया रॉ च्या एजंट आहे का? अशोक खरात सीडीआर प्रकरणी संजय राऊतांचा खोचक सवाल

खरात केवळ भोंदू नाही तर मोठे नेक्सस
रोहित पवार यांनी आपल्या ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे की, भोंदू खरात ऑस्ट्रेलिया, दुबई यासह चार पाच देशात हवालाच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग करत असल्याची तसेच खरातने भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट राजकीय नेत्यांचे हजारून अधिक कोटी या देशांमध्ये पाठवले असल्याचे कळत आहे. खरात हा केवळ भोंदू नाही तर एक मोठे’नेक्सस’आहे, असा आरोप त्यांनी केलाय.

हा विषय राष्ट्रीय सुरक्षेला सुद्धा आवाहन देणारा असल्याने राज्य सरकारकडे पुरेसे पुरावे आले असतील तर गृह विभागाने देखील या प्रकरणाचा राजकीय गोळाबेरजेसाठी वापर न करता सखोल चौकशी केली पाहिजे. या प्रकरणातही ईडी सारख्या यंत्रणांना जाग येईल ही अपेक्षा”, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

असो! या प्रकरणातही ED सारख्या यंत्रणांना जाग येईल, ही अपेक्षा, असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, आधीच लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या १२ गुन्ह्यांनी वेढलेल्या अशोक खरातसाठी रोहित पवारांचे हे आरोप मोठी अडचणीचे ठरू शकतात.

ताज्या बातम्या

default-featured-image

Trimbakeshwar Rain News : त्र्यंबकेश्वरला वादळी वाऱ्यासह पाऊस; घराचे पत्रे उडून...

0
त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar त्र्यंबकेश्वर शहरासह (Trimbakeshwar City) ग्रामीण भागात बुधवारी रात्रीपासून सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस (Rain) सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून,...