Thursday, June 11, 2026
Homeक्राईमNashik Crime : सासरच्यांनी जादूटोणा केल्याचा दावा; सुनेची पतीसह नणंदेविरुद्ध पंचवटी पोलिसांत...

Nashik Crime : सासरच्यांनी जादूटोणा केल्याचा दावा; सुनेची पतीसह नणंदेविरुद्ध पंचवटी पोलिसांत तक्रार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

विवाह (Marriage) झाल्यानंतर काहीना काही कारणातून कुरापती काढून मारहाण (Beating) करतानाच डांबून ठेवत सासरच्यांनी घरात जादूटोणा केल्याचा दावा एका पीडित विवाहितेने केला आहे. त्यानुसार, पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) नोकरदार पीडितेच्या रेल्वेतील सिनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर पतीसह तिच्या सासू व नणंदेविरुद्ध पीडितेचा छळ व अघोरी प्रथा आणि जादुटोणा प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना अटक करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

- Advertisement -

सुमुख श्यामराज पाठक, मेधा श्यामराज पाठक व श्रेया आनंद संख्ख्ये (तिघे रा. कल्पतरु बंगला, बामन देव मंदिराजवळ, उमेळा, नायगाव, वसई, जि. पालघर) अशी संशयितांची (Suspected) नावे आहेत. २७ वर्षीय पीडिता ही मूळची पंचवटीतील तारवालानगर परिसरात राहणारी असून तिचा विवाह २६ डिसेंबर २०२४ रोजी अनुरुप ॲपद्वारे ॲरेंज मॅरिज पद्धतीने झाला. तिच्या फिर्यादीनुसार, विवाह झाल्यावर संशयितांनी लग्नातील खर्च व इतर कौटुंबिक, घरगुती काम व आरोग्याशी निगडीत बाबींवरुन शारीरिक तसेच मानसिक छळ करण्यास सुरुवात केली.

तर, कालांतराने क्षुल्लक कारणातून वाद वाढलेला असताना पती (Wife) सुमुख यांनी १४ मे २०२५ रोजी जेवणासाठी मुंबईतील हॉटेलमध्ये जाण्याचे ठरविले असताना पीडिता पंधरा मिनिटे उशीर झाल्याच्या कारणातून भांडण केले. या घटनेचा वचपा काढण्यासाठी पतीने रात्री कुरबूर सुरु करुन मारहाण करत थेट भिंतीवर फेकले आणि नंतर गळा दाबला. यानंतर कशीतरी सुटका करुन घरातून पळाले. तेव्हा सासू व नणंदेने ओढून घरी नेले.

दरम्यान, यानंतर,काही दिवसांनी संशयितांनी घरातील (Home) वाद व इतर कारणांतून डाव रचून अनोळखी मांत्रिकास घरी आणले. तेव्हा संशयितांनी पीडितेस ‘हा व्यक्ती घरातील वाईट शक्ती नष्ट करण्यासाठी आला आहे’, असे सांगितले. तेव्हा या व्यक्तिने तंत्रमंत्र म्हणून बेडरूममध्ये जाऊन जादूटोणा केला, आरोप पीडितेने केला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला असून, तपास महिला पोलीस निरीक्षक ज्योती आमणे करत आहेत.

पीडितेला पाच आकडी वेतन

पीडिता ही शासकीय नोकरदार असल्याचे समजत असून पती मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणात सिनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर आहे. सासू मेधा या निवृत्त मुख्याध्यापिका आहेत. तसेच सासू बुधवारी तसेच प्रत्येक अमावस्येला एका बाबाबुवाकडे जात होती व त्याने दिलेले तोडगे घरात वापरत होती, असा दावा पीडितेने केला आहे. दरम्यान, पीडितेच्या दाव्यांची सत्यता पडताळून घटना वसई येथे घडल्याने तपास वर्ग केला जाणार असल्याचे समजते.

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरातील गुन्ह्यात चेअरमन कुटेसह 10 संचालकांना अटक

0
श्रीरामपूर, अहिल्यानगर |प्रतिनिधी| Shrirampur, Ahilyanagar बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या फसवणूक प्रकरणात अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात 10 जणांना...