Tuesday, September 8, 2026
HomeनाशिकNashik Dindori Crime : मुलीस फूस लावून पळून नेणाऱ्यास अटक

Nashik Dindori Crime : मुलीस फूस लावून पळून नेणाऱ्यास अटक

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

तालुक्यातील पिंपळगाव धूम (Pimpalgaon Dhum) येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेणाऱ्या आरोपीला दिंडोरी पोलिसांनी (Dindori Police) अटक केली असून, त्याच्याविरुद्ध बाललैंगिक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपळगाव धूम येथील अल्पवयीन तरुणीला (Girl) याच गावातील अक्षय मुरलीधर वाघेरे (वय १८) वर्ष याने लग्नाचे अमिष दाखवले व तिला घराजवळून पळून नेले. ते ननाशी येथे राहत होते. सदर मुलीवर अत्याचार झाल्याची फिर्याद मुलीच्या आईने दिल्याने दिंडोरी पोलिसांनी वाघेरे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, अधिक तपास पोलीस (Police) निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख, पोलिस हवालदार गोतुरणे, पोलीस हवालदार कनोज, पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड, अविनाश आहेर, महिला पोलीस हवालदार गांगोडे करत आहे.

ताज्या बातम्या

मनोज

Manoj Jarange Patil: तुझ्या सात पिढ्या राजकारणात असल्या तरी मी जरांगे...

0
जालना | Jalanaमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असताना सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता...