Thursday, March 13, 2025
Homeक्राईमNashik Crime : 'बांगलादेशी' कलकत्तामार्गे नाशकात; अवैधरित्या घुसखाेरी करणारे आठ जण ...

Nashik Crime : ‘बांगलादेशी’ कलकत्तामार्गे नाशकात; अवैधरित्या घुसखाेरी करणारे आठ जण ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भारतात (India) अवैधरित्या प्रवेश करून नाशिकमधील (Nashik) आडगाव परिसरात (Adgaon Area) एका बांधकाम ठेकेदाराकडे मजुरीचे काम करणाऱ्या आठ बांगलादेशी नागरिकांना (Bangladeshi Citizens) शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यापैकी ७ बांगलादेशी हे दोन महिन्यांपूर्वीच नाशिकला आल्याचे तर एक जण सहा वर्षांपासून शहरात वास्तव्य करत असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे आठपैकी तिघांकडे भारतीय आधारकार्ड, पॅनकार्ड आढळले आहेत.

- Advertisement -

बांगलादेशी नागरिक भारतात अवैधरित्या प्रवेश करून राहत असल्याचे प्रकार उघड होत आहेत. त्यातच आता नाशिक शहरातून (Nashik City) पोलिसांनी (Police) आठ बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या सुचनांनुसार शहर पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांचा शोध सुरु केला आहे.

मध्यवर्ती गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रविण माळी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका निर्माणाधीन इमारतीच्या बांधकामासाठी बांगलादेशी नागरिक मजूर म्हणून काम करत असल्याचे समजले. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सुमारे चार ते पाच दिवस तपास करीत आठ जणांची धरपकड केली. त्यांच्याकडे भारतीय नागरिक असल्याचे पुरावे मागितल्यानंतर त्यांना ते देता न आल्याने पोलिसांनी त्यांना अटक (Arrested) करीत त्यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...