Sunday, July 5, 2026
Homeदेश विदेशBJP Assembly Result2026: पश्चिम बंगालमध्ये तृणमुलचा पराभव, आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा सत्ता; भाजपची...

BJP Assembly Result2026: पश्चिम बंगालमध्ये तृणमुलचा पराभव, आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा सत्ता; भाजपची देशातील किती राज्यात सत्ता?

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
देशातील पाच राज्यांतील बहुचर्चित विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निवडणुकांमध्ये केरळ आणि तामिळनाडू वगळता भाजपला प्रचंड मोठे यश मिळाले. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आली आहे. तामिळनाडूत विजय थलपतिच्या टीव्हीके पक्षाने द्रमुक आणि अण्णाद्रमुकला मागे टाकून १०० पेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत. तर दुसरीकडे, भाजपने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता उलथवून पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन केली आहे. गेली १५ वर्षे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता होती. मात्र, ममता बॅनर्जी यांचा दारुण पराभव झाल्याने आता भारतामधील आणखी एक राज्य भाजपच्या ताब्यात आले आहे. यामुळे देशातील भाजपशासित राज्यांची संख्या वाढली आहे. पश्चिम बंगालच्या विजयानंतर आता देशातील २२ राज्यांमध्ये भाजप किंवा भाजप आघाडीचे सरकार असेल.

West Bengal Legislative Election 2026: पश्चिम बंगालमध्ये भाजपची जोरदार मुसंडी; टीएमसीच्या गडाला सुरुंग, ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया

- Advertisement -

या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे
महाराष्ट्र
हरियाणा
दिल्ली
राजस्थान
गुजरात
मध्य प्रदेश
गोवा
उत्तराखंड
उत्तर प्रदेश
बिहार
सिक्कीम
मेघालय
अरुणाचल प्रदेश
नागालँड
मणिपूर
आसाम
त्रिपुरा
पश्चिम बंगाल
ओदिशा
छत्तीसगढ
आंध्र प्रदेश
पुद्दुचेरी

ताज्या बातम्या

Uddhav Thackeray : “राम मंदिर लुटणाऱ्यांना हिंदू…”; रामरक्षा आंदोलनात उद्धव ठाकरेंची...

0
मुंबई | Mumbai अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Shri Ram Temple) झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराविरोधात आज (रविवार) मुंबईतील (Mumbai) दादर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून...