नाशिक | प्रतिनिधी | Nashik
बेकायदेशिररित्या सावकारीचा (illegally Business) धंदा करुन वसुलीचे टार्गेट ठेवतानाच कर्जदार व्यक्तिच्या पत्नींचा विनयभंग करणाऱ्या खंडणीखोर वैभव देवरेवर (Vaibhav Deore) आता सावकारी व अन्य गंभीर कलमान्वये अकरावा गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्या आर्थिक, शारीरीक व मानसिक छळाला कंटाळलेले कर्जदार न घाबरता पुढे आले असून त्याची कायद्याच्या (Low) कचाट्यातून सुटका होणे आता अशक्य होत चालले आहे. विशेष म्हणजे देवरेने पत्नी सोनाली व शालक निखील पवारच्या मदतीने हा धंदा मांडून अनेकांचे संसार उध्वस्त केल्याचे सिद्ध झाले आहे.
अवैध सावकारीसह जीवे मारण्याची धमकी, विनयभंगासह (Molestation) खंडणीचे गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार वैभव देवरे याने आणखी एका गॅरेजमालकाला जमिनीचे (Land) बनावट दस्तऐवज दाखवून ६३ लाखांना गंडा घातला आहे. अवैध सावकारीतून ३५ लाखांचे कर्ज घेण्यास भाग पाडत गॅरेजमालकाने पैसे परत मागितले असता, त्याने या व्यावसायिकास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सराईत देवरेसह चौघांविरोधात अंबड पोलिसात (Ambad Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविंद पांडुरंग ससाणे (रा. कामटवाडा), वैभव यादवराव देवरे, सोनल वैभव देवरे (दोघे रा. सीमा पार्क अपार्टमेंट, चेतनानगर), निखिल पवार (रा. स्वामी विवेकानंद नगर, सिडको) अशी संशयितांची नावे आहेत.
तर सदाशिव पवार (५८, रा. फडोळ मळा, अंबड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे कामटवाडा परिसरामध्ये (Kamtwada Area) कामिनी टोटेक हे चारचाकी वाहनांचे गॅरेज तर, विल्होळी येथे शिवसाधना प्रा. लि. ही क्रेन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. त्यांना याच कामानिमित्ताने जागेची आवश्यकता असल्याने ते जागेच्या शोधात होते. २०१९ मध्ये त्यांची ओळख संशयित गोविंद ससाणे याच्याशी झाली. त्याची सारुळ येथे जमिन (Land) असून, तिचा व्यवहार झालेला होता.
तरीही वैभव देवरे आणि संशयितांनी (Suspect) संगमताने बनावट कागदपत्रे बनवून कटकारस्थान रचले. यासह हिरावाडीतील जागेचेही बनावट कागदपत्रे दाखवून सदाशिव पवार यांच्याकडून त्या जमिनीच्या व्यवहारापोटी ६३ लाख ४९ हजार रुपये घेतले. तसेच, संशयित देवरे याने गॅरेजमालक पवार यांना व्यवसायासाठी कर्जासाठी घेण्यासाठी बळजबरी केली. त्यानुसार त्याने पवार यांना रोख स्वरुपात तर कधी ऑनलाईनद्वारे (Online) ३५ लाख रुपये दिले. त्यानंतर पवार यांनी देवरे याच्याकडे पैसे मागितले असता, संशयितांनी त्यांना पैसे परत न देता त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.